गोस्वामींना पुन्हा अटक? तीन दिवस आधी नोटीस देऊन कारवाई करावी लागणार

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीसह अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे.
high court says give 3 day notice to arnab goswami before his arrest
high court says give 3 day notice to arnab goswami before his arrest

मुंबई : बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीसह तिचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत.  त्यांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना अटक करावयाची झाल्यास आधी तीन दिवस नोटीस द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस.शिंदे आणि मनीष पितळे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

या प्रकरणात गोस्वामींना कोणताही विशेष दर्जा देऊ नये आणि त्यांनी चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी मुंबई पोलिसांनी केली. यावर खंडपीठ म्हणाले की, हे प्रकरण तीन महिन्यांपासून सुरू असून, अद्याप गोस्वामी यात आरोपी नाहीत. तुम्हाला तपासादरम्यान, काही गोष्टी आढळल्यास गोस्वामींवर कारवाई करण्याच्या 72 तास आधी त्यांना नोटीस देण्यात यावी. रिपब्लिक टीव्ही आणि एआरजी आऊटलियर मीडिया यांच्याविरोधातील चौकशी 12 आठवड्यांत पूर्ण करण्यात येईल, हे म्हणणे मान्य करण्यात येत आहे.   

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी दासगुप्तांच्या जामिनावर उच्च न्यायालयासमोर नुकतीच सुनावणी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील सूत्रधार कोण आणि यात दासगुप्तांची भूमिका काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला. यावर सरकारी वकिलांना आरोपपत्रात दासगुप्ता हेच सूत्रधार असल्याचे सांगितले होते. यावर या प्रकरणातील मास्टरमाईंड अर्णब गोस्वामी आहेत, असे दासगुप्तांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते.    

बनावट टीआरपी प्रकरणात पोलिसांनी 11 जानेवारीला पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यात बीएआरसीच्या फॉरेन्सिक ऑडिटचाही समावेश होता. तसेच, गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट आणि 59 व्यक्तींचे जबाबही न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com