ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा मोठा झटका; 'दुआरे राशन' योजना ठरवली बेकायदेशीर

Mamata Banerjee : या योजनेसाठी 160 कोटी रुपये खर्च होणार होते.
Mamata Banerjee Latest News
Mamata Banerjee Latest NewsSarkarnama

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकत्ता उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने राज्य सरकारची 'दुआरे राशन' योजना बेकायदेशीर ठरवली आहे. पश्चिम बंगाल सरकारची ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या विरोधात असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. पश्चिम बंगाल सरकारने 'दुआरे राशन' योजना सुरू केली होती, त्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरापर्यंत रेशनचे साहित्य उपलब्ध करून द्यायचे होते. (Mamata Banerjee Latest News)

Mamata Banerjee Latest News
"लोकांनी नेतृत्व स्विकारलं तर तो वंशवाद ठरत नाही" : भाजप आमदाराचे वक्तव्य!

या योजनेसाठी 160 कोटी रुपये खर्च होणार होते. ही योजना सुरू करताना ममता सरकारने या योजनेवर सरकार 160 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले होते. लोकांना रेशन पुरविण्याच्या तरतुदीसाठी वाहन खरेदीसाठी सुमारे 21,000 रेशन डीलर्सना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार होते.

Mamata Banerjee Latest News
पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही.

तसेच या योजनेच्या माध्यमातून 10 कोटी लोकांना लाभ देण्याचे सरकारचे लक्ष्य होते. यातून 42 हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र आता ममता बॅनर्जींनाच्या या योजनेला कोलकत्ता उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com