शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला उच्च न्यायालयाचा दिलासा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनीअटक केली आहे. त्याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
high court grants interim relief to shilp shetty husband raj kundra
high court grants interim relief to shilp shetty husband raj kundra

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने त्याला आणखी एका प्रकरणात अटकेपासून संरक्षण दिले आहे. 

पॉर्नोग्राफी फिल्म रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी 2020 मध्ये एक गुन्हा दाखल केला होता. यात राज कुंद्रा आरोपी आहे. या प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी कुंद्राने सत्र न्यायालयात केली होती. ती सत्र न्यायालयाने फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही त्याची ही मागणी मागील आठवड्यात फेटाळली होती. यावर कुंद्राने या प्रकरणातील इतरांना जामीन मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. 

उच्च न्यायालयाने आता कुंद्राला 25 ऑगस्टपर्यंत या प्रकरणी अटकेपासून संरक्षण दिले आहे. पुढील सुनावणी 25 ऑगस्टला होणार असून, पोलिसांनी त्यावेळी राज कुंद्राच्या अटकपूर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.के.शिंदे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. 

कुंद्राला मागील महिन्यात अटक करण्यात आली होती. त्याला सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी बेकायदा असल्याचा दावा त्याने केला होता. त्याने पोलीस कोठडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याला ताब्यात घेण्याआधी पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती, असा दावा केला. या प्रकरणी त्याने उच्च न्यायालयात जामीन अर्जही केला होता. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेल्या पोलीस कोठडीच्या आदेशात काहीही चुकीचे नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. कुंद्रा हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 

कुंद्रा (वय 45) याला पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी 19 जुलैला अटक झाली आहे. या प्रकरणात एकूण 12 आरोपी आहेत. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कुंद्रा याला सुरवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुंद्रा असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे. 

या प्रकरणात कुंद्रा हा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या बँक खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते. हॉटशॉट ॲप्सद्वारे हा प्रकार चालविला जात होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com