लालूंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; सुटकेचा मार्ग अखेर खुला

चारा गैरव्यवहार प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav Sarkarnama

रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना झारखंड उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयानं लालूंना जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायालयानं फेब्रुवारी महिन्यात लालूंना पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणात (fodder scam) पाच वर्षे कारावास आणि 60 लाख रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. आता लालूंच्या जामिनावर निर्णय झाल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दोरांडा कोशागारातून बेकायदा पद्धतीने 139.35 कोटी रुपये काढल्याप्रकरणी लालूंना फेब्रुवारी महिन्यात शिक्षा सुनावण्यात आली. हा खटला चारा गैरव्यवहार प्रकरणातील आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने लालूंना जामीन मंजूर केला आहे. प्रकृतीचे कारण आणि त्यांनी शिक्षा भोगलेला कालावधी याचा विचार करून उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. लालूंना एक रुपयांची हमी आणि 10 लाख रुपयांचा दंड मात्र भरावा लागणार आहे. त्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका होणार आहे.

Lalu Prasad Yadav
भाजप नेत्याची आमदारकी धोक्यात! जात प्रमाणपत्र अवैध ठरताच सरकारनं उचललं पाऊल

सुमारे 900 कोटी रुपयांच्या चारा गैरव्यवहार प्रकरणात लालूंना आतापर्यंत एकूण 14 वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांना आधी चार प्रकरणात जामीन मिळाला आहे. डुमका, देवघर आणि चैबासा कोशागाराशी निगडित हे खटले आहेत. आता दोरांडा प्रकरण हे पाचवे आणि शेवटचे होते. त्यातही त्यांना जामीन मिळाला आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर त्यांची आठवडाभरात सुटका होईल, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. अविभाजित बिहार राज्य (झारखंडसह) असताना लालूंनी विविध सरकारी कोशागारातून बेकायदा पैसे काढून 950 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. पाटणा उच्च न्यायालयाने मार्च 1996 मध्ये दिलेल्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. यानंतर सीबीआयने जून 1997 मध्ये लालूंना या प्रकरणात आरोपी ठरवत आरोपपत्र दाखल केले होते.

Lalu Prasad Yadav
मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारताच काँग्रेसनं टाकला मोठा डाव!

लालूंना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीने रांचीतील रुग्णालयातून दिल्लीतील एम्समध्ये हलवण्यात आले होते. त्यांना हृदयविकार आणि मूत्रपिंडविकाराचा त्रास होत आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये हलवण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला होता. मात्र, एम्समधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर लालूंना दाखल करुन न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लालूंना पुन्हा रांची कारागृहात पाठवण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com