Tajinder Pal Singh Bagga latest news Update
Tajinder Pal Singh Bagga latest news UpdateSarkarnama

भाजप नेत्यावरून तीन राज्यांतील पोलिसांत जुंपली अन् अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा

भाजप नेत्याच्या अटकेवरून उडाला मोठा गदारोळ

नवी दिल्ली : दिल्ली भाजपचे नेते तेजिंदर बग्गा (Tajinder Pal Singh Bagga) यांच्याविरूद्ध पंजाबच्या मोहाली येथील न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. यापुढील सुनावणीवेळी त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होती. यावर बग्गा यांनी पंजाब व हरियाना उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. बग्गांच्या अटकेवरून भाजप (BJP) आणि आपमध्ये (AAP) जुंपली आहे.

दिल्ली पोलिसांनी 6 मे रोजी पंजाब पोलिसांच्या ताब्यातून बग्गांची नाट्यमयरीत्या सुटका केली होती. त्यांच्या अटकेची मागणी करताना पंजाब पोलिसांनी पुन्हा एक याचिका दाखल केली होती. त्यावर मोहालीचे न्यायदंडाधिकारी रविजेश इंद्रजित सिंह यांनी पुढील सुनावणीवेळी बग्गा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करावे, असा आदेश पोलिसांना दिला होता. बग्गा यांच्यावर कलम १५३ अ, ५०५, ५०५(२), ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.

Tajinder Pal Singh Bagga latest news Update
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात, माझे कपडे विकेन पण गहू महाग होऊ देणार नाही!

बग्गा यांना आता उच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने त्यांना पोलिसांना अटक करता येणार नाही. सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी बग्गा यांच्यावर मोहाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात बग्गा यांना उच्च न्यायालयाने 5 जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. दरम्यान, बग्गा यांना त्यांच्या दिल्लीतील घरातून पंजाब पोलिसांनी 6 मे रोजी सकाळी अटक केली होती. मात्र हरियाना पोलिसांनी त्यांच्या पथकाला रस्त्यातच अडविले.पंजाब व हरियाना उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिस बग्गा यांना घेऊन काल मध्यरात्री दिल्लीत परतले. बग्गा यांचे दिल्ली भाजपने जोरदार स्वागत केले.

Tajinder Pal Singh Bagga latest news Update
राजकारण तापलं! सासूबाईंशी न पटल्यानं जावयानं थेट पक्षालाच केला रामराम

दिल्ली पोलिसांनी बग्गा यांना दिल्लीत आणल्यावर सुरक्षा पुरविली आहे. तेजिंदर यांना खोट्या आरोपांखाली अडकविण्याचा प्रयत्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत, असा आरोप बग्गांचे वडील प्रितपालसिंग यांनी केला आहे. केजरीवाल सरकार हे शिखविरोधी सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला. केजरीवाल यांच्या धमक्यांना भीक घालणार नाही व त्यांच्या हुकूमशाहीविरोधात जाहीर लढा देत राहू असाही इशारा त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com