कंगना राणावतला उच्च न्यायालयाचा दणका

अभिनेत्री कंगना राणावत सध्या वेगवेगळ्या खटल्यांमुळे चर्चेत आहे. यातील एका खटल्यात उच्च न्यायालयाने तिला दणका दिला आहे.
high court dissmisses kangana ranaut plea in javed akhtar case
high court dissmisses kangana ranaut plea in javed akhtar case

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सध्या वेगवेगळ्या खटल्यांमुळे चर्चेत आहे. यातील एका खटल्यात उच्च न्यायालयाने (High Court) तिला दणका दिला आहे. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगनाविरूध्द मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका कंगनाने केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. 

अंधेरीतील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुरु केलेल्या अवमान खटल्याच्या कारवाईला कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने योग्य प्रकारे हा निर्णय घेतला नाही, असा दावा कंगनाने केला होता. यावरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांनी 1 सप्टेंबरला निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने कंगनाची याचिका रद्दबातल ठरवली आहे. 

दरम्यान, कंगनाविरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्याचा इशाराही न्यायालयाने नुकताच दिला होता. मुंबईतील अंधेरी येथील महानगर न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी कंगनाच्या वकिलांनी ती देशात नसल्याने सुनावणीला येणार नाही. त्यामुळं इथे उपस्थित राहण्यापासून सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. 

कंगना एकाही तारखेला हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्याची मागणीही भारद्वाज यांनी केली होती. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश आर. आर. खान यांनी कंगनाला सुनावणीच्या दिवसापुरते हजर न राहण्याची सवलत दिली. पण पुढील तारखेला त्या हजर न झाल्यास जामीनपात्र वॉरंट काढले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

काय आहे प्रकरण?
कंगनाने अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॅालिवूडमधील सुसाईड गँगमध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले होते. तिच्या या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला होता.कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलिस तिला वारंवार समन्स बजावत होते. परंतु ती त्याला उत्तर देत नाही, अशी माहिती भारद्वाज यांनी न्यायालयात दिली होती. या प्रकरणात कंगना एकदाही न्यायालयात सुनावणीला हजर राहिलेली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com