तुम्हाला मोदींच्या फोटोची लाज वाटते का? उच्च न्यायालयाची विचारणा

लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला आक्षेप घेण्यात आला आहे.
Narendra Modi 

Narendra Modi 

Sarkarnama

कोची : देशात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉनचा (Omciron) धोका वाढू लागल्याने सरकारने कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. यातच लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) फोटोला आक्षेप घेण्यात आला आहे. यावर केरळ उच्च न्यायालयाने मोदींच्या फोटोची तुम्हाला लाज का वाटते, असा सवाल याचिकाकर्त्याला केला आहे.

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढून टाकावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यावरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला सवाल केला. कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो असेल, तर तुम्हाला काय आक्षेप आहे? असा सवाल न्यायालयाने केला. याचिकाकर्ता हा जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप या संस्थेचा कर्मचारी आहे. यावर न्यायालयाने नेहरूंच्या नावावर विद्यापीठाचे नामकरण करण्यापेक्षा यात वेगळे काय आहे, अशी विचारणा केली.

इतर देशांच्या लसीकरण प्रमाणपत्रावर त्यांच्या पंतप्रधानांचे फोटो नसल्याचा मुद्दा याचिकाकर्त्याने उपस्थित केला. यावर न्यायालय म्हणाले, तुम्ही नेहरूंच्या नावाने सुरू केलेल्या संस्थेत काम करता. ते सुद्धा पंतप्रधान होते. त्यांचे नाव काढून टाकावे, अशी मागणी तुम्ही का केली नाही. तुम्हाला पंतप्रधानांची लाज का वाटते? देशातील 100 कोटी जनतेला याबद्दल काही वाटत नाही तर मग तुम्हालाच का आक्षेप आहे. आम्हाला तुमचा आक्षेप समजून घ्यायचा आहे.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi&nbsp;</p></div>
ममतांचा पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीचा आमदार फोडला

देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे. आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरासही सरकारने परवानगी दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi&nbsp;</p></div>
सचिन वाझे कशी करायचा वसुली? पोलीस अधिकाऱ्यांनीच केला गौप्यस्फोट

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com