जगाला एकाच फोटोतून दिसणारा मुल्ला हिबातुल्ला चालवणार अफगाण सरकार

मागील 20 वर्षे अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकलेल्या अमेरिकेचे अखेरचे विमान सोमवारी मायदेशी परतले.
जगाला एकाच फोटोतून दिसणारा मुल्ला हिबातुल्ला चालवणार अफगाण सरकार
Hibatullah Akhundzada to lead Taliban govt in Afghanistan

काबूल : अफगाणिस्तानवर कब्जा मिळवून पंधरा दिवस उलटल्यानंतर तालिबानने महत्वाची घोषणा केली आहे. तालिबानचा सर्वेसर्वा असलेला मुल्ला हिबातुल्ला अखुंदझादा हा अफगाण सरकार चालवणार आहे. पण अद्याप हा नेता जगासमोर आलेला नाही. विशेष म्हणजे या नेत्याचे आतापर्यंत केवळ एकच छायाचित्र पाहायला मिळते. हे छायाचित्र तालिबानने 2016 मध्ये प्रसिध्द केले होते. (Hibatullah Akhundzada to lead Taliban govt in Afghanistan)

मागील 20 वर्षे अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकलेल्या अमेरिकेचे अखेरचे विमान सोमवारी मायदेशी परतले. त्यानंतर तालिबानने मोठा जल्लोष करत विजय साजरा केला. आता सरकार स्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत. मुल्ला हिबातुल्ला याच्या नेतृत्वाखाली अफगाण सरकार चालणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हिबातुल्ला हा तालिबानच्या प्रमुख पाच नेत्यांपैकी एक असला तरी त्याचाच वरचष्मा राहिला आहे. 

अमेरिकेच्या हल्यात 2016 मध्ये तालिबानचा संस्थापक मुल्ला मंसूर अख्तर मारला गेल्यानंतर तालिबानची सूत्र मुल्ला हिबातुल्लाच्या हातात आली. त्याचवेळी त्याचं एक छायाचित्र प्रसिध्द करण्यात आलं होतं. त्यानंतर तो कधीच जगासमोर आला नाही. तो खूपच धार्मिक आहे. अख्तर मारला गेल्यानंतर विभागलेल्या तालिबानला संघटित करण्याची महत्वाची जबाबदारी त्याच्यावर होती. 

मुल्ला हिबातुल्ला हा 1990 मध्ये तालिबानमध्ये दाखल झाला. तो मूळचा कंदाहारचा असल्याचं सांगितलं जातं. सध्याही तो तिथंच असल्याचा दावा तालिबानकडून केला जात आहे. 1995 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर त्याच्यावर देशाचा गुन्ह्यांचा आलेख कमी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. 2015 मध्ये तालिबानच्या उपप्रमुख बनला होता. 

मुल्ला हिबातुल्लाचा मुलगा आधीपासूनच तालिबानशी जोडला गेला होता. तो तालिबानचा प्रमुख होण्यापूर्वी तालिबानच्या आत्मघातकी पथकामध्ये होता. पण हिबातुल्ला याने प्रमुख झाल्यानंतरही त्याच्या मुलाला या पथकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. एका दहशतवादी हल्ल्यामध्येच त्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालिबानमध्ये हिबातुल्लाविषयी आदराची भावना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.