Hema Malini Apologize : बॉलीवुड 'ड्रीम गर्ल' BJP खासदार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर ; चुकीला माफी नाही.., Tweet आलं अगंलट..

Hema Malini calling bihu as bihar festival : चुक लक्षात आल्यानंतर हेमा मालीनी यांनी माफी मागितली.
 Hema Malini
Hema Malini Sarkarnama

Hema Malini said sorry after calling bihu as bihar festival : बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, 'ड्रीम गर्ल' भाजपच्या खासदार हेमा मालीनी या समाज माध्यमांवर सक्रिय असतात. पण कधी-कधी त्यांनी केलेली पोस्ट त्यांच्या अंगलट येते.

तीन वर्षांपूर्वी त्यांनी संसद भवन परिसरातील एका कार्यक्रमाचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या होत्या. आता त्यांच्या एका टि्वटमुळे विरोधक आणि नेटकऱ्यांच्या हाती आयते कोलीत मिळालं आहे.

शुक्रवारी त्यांनी केलेले टि्वट त्यांच्या अडचणीचे ठरलं. नेटकऱ्यांची ट्रोल केल्यानंतर हेमा मालीनी यांनी माफी मागितली. काही वेळानं ते टि्वट डिलिट केलं.. पण, शुक्रवारी दिवसभर ट्रोलर्सच्या निशाण्यावर त्या राहिल्या.

 Hema Malini
Karnataka Election 2023 : वडीलांची राजकीय गादी जिंकण्यासाठी सख्ये भाऊ आमने-सामने

सध्या आसाममध्ये ‘बिहू’ हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या सणानिमित्त आसामच्या जनतेला हेमा मालीनी यांनी टि्वट करुन शुभेच्छा दिल्या. पण त्यात त्यांनी एक मोठी चुक केली. त्या टि्वटचा नेटकऱ्यांनीच चांगलाच समाचार घेतला.

‘बिहू’हा सण आसाममध्ये साजरा होतो, पण त्यांनी आसाम ऐवजी बिहार हा शब्द वापरुन ‘बिहू’च्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले. आपली चुक लक्षात आल्यानंतर हेमा मालीनी यांनी टि्वट करुन माफी मागितली.

झाडू मारण्यावरून ट्रोल

तीन वर्षापूर्वी हेमा मालिनी यांनी संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवली होती. दरम्यान हेमा मालिनी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडाओमध्ये त्यांना झाडू मारण्याच्या पद्धतीवरून नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील हेमा मालिनी यांची ट्विट करत खिल्ली उडवली होती. त्यांचे हे मजेशीर ट्विट चाहत्यांना आवडले परंतु हेमा मालिनी यांना ते आवडले नाही.

 Hema Malini
Karnataka Election 2023 : भाजपला मोठा झटका ; तिकीट न मिळाल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश..

धर्मेंद्र यांनीही मागितली होती माफी

त्यानंतर धर्मेंद्र यांनी ट्विटद्वारे हेमा मालिनी यांची आधी केलेल्या ट्विटबद्दल माफी मागितली होती. त्यांनी ट्विटमध्ये त्यांचा एक जूना हात जोडलेला फोटो शेअर केला आहे. ‘कधी कधी मी काहीही बोलतो. ही काहीची भावना लोक काही समजून बसले आहेत यार. गोष्ट झाडूचीही.. कधी नाही करणार. देवा मला माफ कर’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते.

 Hema Malini
Karnataka Assembly Election : माजी उपमुख्यमंत्र्याच्या विरोधात RSSचा पाठिंबा असलेले IAS अनिल कुमार रिंगणात..

‘बिहू’ म्हणजे काय ..

आसाममध्ये ‘बिहू’ हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ‘बिहू’ हा आसाम राज्यातील तीन महत्त्वांच्या आसामी सणांचा एक संच आहे. एप्रिलमध्ये साजरा केला जातो तो ‘रोंगाली’ किंवा ‘बोहाग बिहू’, ऑक्टोबरमध्ये येतो ‘कोंगली’ किंवा ‘काटी बिहू’ आणि जानेवारीमध्ये आसाममध्ये ‘भोगली’ किंवा ‘माघ बिहू’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com