हेलिकॉप्टर अपघाताची भीषणता : 9 जणांचे मृतदेह अद्याप नातेवाईकांकडे दिलेच नाहीत

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 13 पैकी केवळ चारच जणांच्या मृतदेहांची ओळख पटवता आली आहे.
Helicopter Crash
Helicopter CrashSarkarnama

नवी दिल्ली : सरसेनाध्यक्ष (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) मृत्यू झाला आहे. या अपघाताची भीषणता आता समोर येऊ लागली आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 13 पैकी केवळ चारच जणांच्या मृतदेहांची ओळख पटवता आली आहे, अशी माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघात एवढी भीषण होता की, मृतांची ओळख पटवणे अवघड बनले आहे. केवळ चारच जणांच्या मृतदेहांची ओळख पटवता आली आहे. त्यात जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका, ब्रिगेडियर एल.एस.लिड्डर आणि आणखी एका व्यक्तीची ओळख पटली आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांची ओळख पटवता आलेली नाही. ओळख पटवण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांची मदत घेतली जात आहे. याचबरोबर इतर वैद्यकीय तपासण्यांचा आधार घेतला जात आहे. ओळख पटल्यानंतरच हे मृतदेह नातेवाईकांकडे सोपवले जाणार आहेत.

Helicopter Crash
सरसेनाध्यक्षांच्या मृत्यूनंतर संरक्षणमंत्र्यांची लोकसभेत मोठी घोषणा

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज लोकसभेत बोलताना रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी तिन्ही सैन्य दलांकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिल्याचेही सांगितले. या चौकशीचे नेतृत्व हवाई दलाचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चिफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंह हे करणार आहेत. ते स्वत:ही हेलिकॉप्टर पायलट आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स आता सापडला आहे. ब्लॅकबॉक्ससाठी अपघात घडलेल्या ठिकाणापासून 300 मीटर ते 1 किलोमीटर परिसरात शोध घेण्यात आला आहे. हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स सापडल्याने अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

Helicopter Crash
बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचं नेमकं कारण येणार समोर

जनरल बिपिन रावत हे काल (ता.8) तमिळनाडूच्या निलगिरी पर्वत रांगेतील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन या ठिकाणी तिथले प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात होते. परंतु, तमिळनाडूतील कुन्नूरजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. यातील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हवाई दलाने दिली होती. रावत यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदरसिंग, नायक गुरूसेवकसिंग, नायक जितेंद्रसिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com