आरोग्य अधिकाऱ्याने कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला अन् पाच दिवसांत पॉझिटिव्ह

देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे.
health officer from gujarat found covid 19 positive after taking vaccine
health officer from gujarat found covid 19 positive after taking vaccine

अहमदाबाद : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. असे असताना गुजरातमध्ये आरोग्य अधिकाऱ्याने कोरोना लशीचा डोस घेतल्यानंतर तो पाच दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची बाब समोर आली आहे. त्यांना सौम्य लक्षणे दिसत असून, सध्या त्यांना घरीच विलगणीकरणात ठेवण्यात आले आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.  

आता गांधीनगरमधील देहगाम तालुक्याचे आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी कोरोना लशीचा पहिला डोस 16 जानेवारीला घेतला होता. त्यानंतर त्यांनी 15 फेब्रुवारीला दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर त्यांना ताप आला. त्यांची चाचणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर पाच दिवसांत त्याला संसर्ग झाल्याचे समोर आले. 

याबाबत बोलताना गांधीनगरचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.एम.एच.सोलंकी म्हणाले की, आरोग्य अधिकाऱ्याला सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले. त्यांची प्रकृती आता सुधारली असून, उद्यापासून (ता.7) ते कामावर हजर होणार आहेत. कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होण्यास सुमारे 45 दिवसांचा कालावधी लागतो. या काळात लस घेतल्यानंतरही मास्क लावण्यासह इतर खबरदारीच्या उपाययोजना करायला हव्यात. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com