माझ्या अटकेसाठी सीबीआय अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याने त्यांनी आत्महत्या केली: सिसोदिया

Manish Sisodia : तुमची इच्छा असेल तर मला अटक करा, पण तुमच्या अधिकार्‍यांचे कुटुंब उद्ध्वस्त करू नका
Manish Sisodia Latest News
Manish Sisodia Latest Newssarkarnama

दिल्ली : दिल्लीतील (Delhi) अबकीर धोरणावरून झालेल्या गदारोळात मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी सीबीआय (CBI) अधिकाऱ्याबाबत मोठा दावा केला आहे. सिसोदिया म्हणाले की, यापूर्वी आत्महत्या केलेल्या सीबीआय अधिकाऱ्यावर मला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यासाठी कायदेशीर मंजुरी देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. सीबीआय अधिकाऱ्यांला मानसिक दबाव सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना हा दावा केला आहे. (Manish Sisodia Latest News)

Manish Sisodia Latest News
पंतप्रधान मोदी माझ्याबद्दल चांगले बोलले म्हणून मी काही त्यांच्या विचारांचा होत नाही...

सिसोदिया म्हणाले की, माझ्यावर खोट्या अबकारी प्रकरणात अडकवण्यासाठी सीबीआय अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात आला होता. मानसिक दडपण सहन न झाल्याने त्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. हे दुर्दैवी आहे, यामुळे मी खूप दुखावलो आहे. मला पंतप्रधानांना विचारायचे आहे की अधिकाऱ्यांवर इतका दबाव का टाकला जात आहे. त्यांना एवढे मोठे पाऊल उचलण्यास का भाग पाडले जात आहे? तुमची इच्छा असेल तर मला अटक करा, पण तुमच्या अधिकार्‍यांचे कुटुंब उद्ध्वस्त करू नका, असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदींवर लगावला आहे.

मनीष सिसोदियांनी केलेले दावे फेटाळताना सीबीआयने सांगितले की, आम्ही त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळतो. मृत सीबीआय अधिकारी जितेंद्र कुमार यांचा दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. त्यांनी केलेले आरोप निराधार आहेत. त्याच्याविरुद्ध अद्याप तपास सुरू आहे. सध्या तरी आम्ही त्याला क्लीन चिट दिलेली नाही. अशा वक्तव्याने त्यांना अबकारी धोरणाचा मुद्दा वळवायचा आहे, असे सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Manish Sisodia Latest News
उद्धव ठाकरेंना जागा दाखवा म्हणत, अमित शहांनी थोपटले दंड

दरम्यान, दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये केलेल्या विकासकामांचा अभिमान असल्याचे सिसोदीया यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या शिक्षण विभागातील भाजपच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सिसोदिया यांनी सोमवारी सांगितले की, दिल्लीच्या शाळांमध्ये केलेल्या विकासकामांचा मला अभिमान आहे. तसेच शिक्षक दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, फाशी किंवा तुरुंगात जावे लागले तरी ते शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी काम करत राहतील, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com