मोहन भागवत यांच्याभोवती कधी महिला पाहिल्यात का?

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नवीन बोधचिन्हाचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मोहन भागवत यांच्याभोवती कधी महिला पाहिल्यात का?
Mohan Bhagwat Rahul Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (BJP-RSS) जोरदार टीका केली. सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi)  यांचं एखादं छायाचित्र पाहिल्यानंतर त्यात त्यांच्याभोवती 2-3 महिला दिसतात. पण भागवत यांचं महिलांसोबतच एखादं छायाचित्र पाहिलं आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. (Have you seen a picture of Mohan Bhagwat with woman says Rahul Gandhi) 

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नवीन बोधचिन्हाचं  अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आरएसएसनं महिलांना बाजूला केलं तर आम्ही महिलांना व्यासपीठ निर्माण करून दिलं. मोदी-आरएसएस महिला पंतप्रधान करणार नाहीत, पण काँग्रेसनं केलं, असं राहुल यांनी सांगितलं.

आज देशात आरएसएस व भाजपचं सरकार आहे. त्यांच्या आणि आपल्या विचारधारेत फरक आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता असल्यानं मी इतर कोणत्याही विचारधारेशी जुळवून घेऊ शकतो पण त्यांच्या विचारधारेशी कधीच समझोता करू शकत नाही. काँग्रेसची विचारधारा महात्मा गांधींची विचारधारा आहे. तर भाजप-आरएसएसची विचारधारा गोडसे आणि सावरकर यांची विचारधारा आहे, असं राहुल म्हणाले.

भाजपचे लोक म्हणतात की त्यांचा पक्ष हिंदूचा आहे. पण मागील 100 ते 200 वर्षांत कुणाला हिंदू धर्म समजला असेल तर ते महात्मा गांधी आहेत. भाजपलाही ही गोष्ट मान्य आहे. आरएसएसने हिंदूच्या छातीत तीन गोळ्या का मारल्या? महात्मा गांधींनी अहिंसेला सर्वात चांगल्या पध्दतीनं समझावलं. हिंदू धर्म अहिंसेचा पाया आहे, मग त्यांना गोळी कार मारली. याचा विचार करायला हवा, अशी टीका राहुल यांनी केली. 

भाजप धर्माची दलाली करते पण स्वत:ला हिंदूंचा पक्ष म्हणते, अशी टीका करत राहुल म्हणाले, भाजप स्वत:ला हिंदू पक्ष म्हणते पण दुसरीकडे लक्ष्मी (अर्थव्यवस्था) वर हल्ला करते. महिलांची ताकद कमी करून माँ दुर्गावर हल्ला करत आहे. भाजप जनतेपासून रोजगार, ज्ञान, निडरता या शक्ती हिसकावून घेत आहे, असं टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडलं.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in