'देशात विद्वेष वाढतोय,आपण लक्ष घाला'; १०८ माजी अधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

PM Narendra Modi| वाढत्या घटनांवर पंतप्रधान मोदींचे मौन हे देशासाठी घातक
'देशात विद्वेष वाढतोय,आपण लक्ष घाला'; 
१०८ माजी अधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
PM Narendra Modi|

नवी दिल्ली : देशातील 108 माजी सरकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र पाठवत देशातील बिघडत चाललेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. 108 माजी सरकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना पाठवलं आहे. यात ज्युलिओ रिबेरो, रवी बुद्धीराजा, व्ही पी.राजा, मीरा बोरवणकर आणि अण्णा दाणी हे महाराष्ट्रातील काही अधिकाऱ्यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

देशातील भाजपशासित राज्यांमध्ये अल्पसंख्यांकावर वाढत्या हल्ल्यांबाबत आणि हिंसाचाराबाबत भाष्य केलं आहे. देशात तिरस्काराचे वादळ वाढत चालले आहे. यात मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजच नव्हे तर देशाच्या संविधानालाही धोका आहे. देशातील भाजपशासित राज्यात विद्वेषाचे वातावरण वाढत असून अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनेत वाढ होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी माजी सरकारी अधिकाऱ्यांनी केली आहे.

PM Narendra Modi|
सोमय्यांचा गौप्यस्फोट; 'पोलीस आयुक्त संजय पांडे करणार शिवसेनेत प्रवेश'

गेल्या काही वर्षांत आणि महिन्यांत, आसाम, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध विशेषत: मुस्लीम समुदायाविरुद्ध द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत आणि याचे भयावह परिणामही समोर आले आहेत. दिल्ली वगळता या राज्यांमध्ये भाजपचे सरकार असून दिल्लीतील पोलिस केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असल्याचे पत्रात म्हटले आहे.

याशिवाय देशातील वाढत चाललेला विद्वेष आणि कट्टरतावादी राजकारणावरुन चिंताही व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर अशा वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर पंतप्रधान मोदींचे मौन हे देशासाठी सर्वात मोठा धोका असल्याचेही या अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यामध्ये विद्वेषाचं राजकारण वाढलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या वर्षात नरेंद्र मोदी यांनी निष्पक्षपणे असे राजकारण थांबवण्यासाठी बोलायला पाहिजे, पंतप्रधानांनी यावर गप्प राहिल्यास देशाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी काळजीही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.