Sandeep Singh : विनयभंगाचा आरोप होताच मंत्र्याचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Sports Minister Sandeep Singh : या प्रकणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची सरकारची घोषणा
Sports Minister Sandeep Singh
Sports Minister Sandeep Singh Sarkarnama

Sports Minister Sandeep Singh : हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंह यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. थेट क्रीडा मंत्र्यांवर विनयभंगाचा आरोप करण्यात आल्याने हरियाणात खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर मंत्री संदीप सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानंतर क्रीडामंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

एका महिला प्रशिक्षकाने संदीप सिंह यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप केला. याबाबत त्या महिला प्रशिक्षकाने पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणाची माहिती सांगितली. त्यानंतर चंदीगडमध्ये क्रीडामंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

या आरोपानंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हरियाणातील विरोधी पक्षांनी क्रीडामंत्री संदीप सिंह यांना पदावरून तत्काळ हटवण्याची मागणी केली. यानंतर हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला.

Sports Minister Sandeep Singh
Congress : धवलसिंह मोहिते पाटलांनी जपला आजोबांच्या दोस्तीचा वसा; मंगळवेढा काँग्रेसची धुरा सोपवली कट्टर समर्थकाकडे

दरम्यान, मंत्री संदीप सिंह यांच्यावर एका महिला प्रशिक्षकाने लैंगिक छळाचा आरोप केल्यामुळे संदीप सिंह अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर या सर्व प्रकणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा हरियाणा (Haryana) सरकारने केली आहे.

Sports Minister Sandeep Singh
Eknath Shinde : ठाकरेंपाठोपाठ शिंदेंकडूनही शिवशक्ती - भीमशक्तीचा प्रयोग? नेमकं काय घडलं?

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, महिला प्रशिक्षकाने संबधीत मंत्र्याच्या निवासस्थानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर संबधीत क्रीडामंत्र्यांनी प्रेयसी बनण्याची ऑफर दिली. ते मला मेसेज पाठवत होते, असा आरोप या महिलेने केला आहे.

याबाबत आपल्याकडे पुरावे असून आपण ते पोलीसांना देणार असल्याचे महिला प्रशिक्षकाने सांगितले आहे. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्री मनोहर लाल (Manoharlal Khattar) आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांची देखील भेट घेणार असल्याचं आरोप करणाऱ्या महिलेने सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com