काँग्रेसची एका आमदारासाठी धावपळ; राज्यसभेच्या उमेदवाराचे धाबे दणाणले

देशातील चार राज्यांत राज्यसभेच्या सोळा जागांसाठी येत्या 10 तारखेला मतदान होणार आहेत.
Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
Congress party Latest Marathi News, Political News Updates in MarathiSarkarnama

चंदीगड : देशातील चार राज्यांत राज्यसभेच्या सोळा जागांसाठी येत्या 10 तारखेला मतदान होणार आहेत. त्यापैकी हरयाणा आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हरयाणामध्ये ज्येष्ठ नेते अजय माकन यांच्या विजयासाठी काँग्रेसला घाम गाळावा लागणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यातच एका आमदाराने बंडाचं निशान फडकावल्याने नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. (Rajya Sabha Election News Updates)

हरयाणामध्ये अजय माकन यांच्याविरोधात भाजपने एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. राज्यात दोन जागांवर मतदान होणार आहे. एकूण 90 आमदार असून भाजपकडे 40 तर काँग्रेसकडे 31 संख्याबळ आहे. एका उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 31 मतांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसला प्रत्येक मत महत्वाचं आहे.

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
राणा दाम्पत्याला पोलिसांची नोटीस; राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापलं

त्यातच काँग्रेसचे आमदार कुलदीप बिश्नोई यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बिश्नोई यांना प्रदेशाध्यक्षपदी संधी न दिल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी आंतरआत्माचा आवाज ऐकून राज्यसभेसाठी मतदान करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे माकन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

आता बिश्नोई यांनी थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाही साकडे घातले आहे. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत ते राहुल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीवरच माकन यांच्या विजयाचं बरचंस गणित अवलंबून असणार आहे.

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
...तर शेवटच्या पाच मिनिटांत मतदान मारणार! बच्चू कडूंनी वाढवलं शिवसेनेचं टेन्शन

दरम्यान, राजस्थानमध्ये काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागत आहे. राजस्थानमध्ये भाजपने (BJP) उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांना पाठिंबा देऊन मैदानात उतरवलं आहे. यानंतर तातडीनं काँग्रेसच्या (Congress) सगळ्या आमदारांना रिसॉर्टवर हलवण्यात आलं. पण एका मंत्र्यासह सहा आमदार गायब झाल्यानं काँग्रेसचं टेन्शन वाढलं. अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी त्या सहा जणांना घेऊन थेट हॉटेलमध्ये दाखल झाले.

काँग्रेसनं आपल्या आमदारांना उदयपूरमधील रिसॉर्टवर हलवलं. त्यावेळी एका मंत्र्यासह सहा आमदार त्यात नव्हते. या आमदारांना रिसॉर्टवर दाखल होण्याचा आदेश पक्षाने दिलेला होता. यासाठी त्यांना अंतिम मुदतही देण्यात आली होती. तरीही हे आमदार रिसॉर्टवर पोचले नव्हते. हे आमदार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मत देण्याची भीती काँग्रेसला होती. अखेर मुख्यमंत्री गेहलोत यांनीच सारी सूत्रे हाती घेतली. त्यांनी या सहा आमदारांची भेट घेतली. या भेटीनंतर चार्टर विमानाने या आमदारांना सोबत घेऊनच गेहलोत हे हॉटेलवर परतले. यामुळं काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा जीव भांड्यात पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com