राज्यपालांच्या शपथविधीत जागाच न मिळाल्याने भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांना राग अनावर

राजधानी दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या शपथविधीच्या राजकीय नाराजीनाट्य पाहायला मिळाले.
Ex Minister Dr Harsh vardhan Latest Marathi News
Ex Minister Dr Harsh vardhan Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना (Vinay Kumar Saxena) यांच्या शपथविधीच्या राजकीय नाराजीनाट्य पाहायला मिळाले. शपथविधीसाठी आलेले माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार डॉ. हर्षवर्धन यांना बसायला जागाच मिळाली नाही. त्यामुळे संतापलेल्या हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमातूनही काढता पाय घेतला. (Dr Harsh vardhan Latest Marathi News)

अनिल बैजल यांनी राजीनामा दिल्यानंतर विनय कुमार सक्सेना यांची नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना गुरूवारी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी पदाची शपथ दिली. ते दिल्लीचे 22 वे नायब राज्यपाल असतील. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्लीतील मंत्री, विधानसभा अध्यक्ष, खासदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. (Harsh Vardhan returned in the middle of the swearing in ceremony of the new LG)

Ex Minister Dr Harsh vardhan Latest Marathi News
भाजपला धक्का; माजी आमदाराच्या नातवासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शपथविधीच्या कार्यक्रमासाठी डॉ. हर्षवर्धन यांना निमंत्रित करण्यात आले होते. पण कार्यक्रमस्थळी आल्यानंतर बसण्यासाठी योग्य व्यवस्था न करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही व्यवस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी तिथेच खडसावले. नायब राज्यपालांकडे याबाबत तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला.

हर्षवर्धन यांच्या इशाऱ्यानंतर तातडीने सोफा आणण्यासाठी धावपळ सुरू झाली. पण तोपर्यंत हर्षवर्धन यांनी तिथून काढता पाय घेतला. यावेळी बाहेर जाताना त्यांनी माध्यमांसमोरही नाराजी व्यक्त केली. 'खासदारांना बसण्यासाठीही त्यांनी जागा ठेवली नाही,' अशा संतापलेल्या स्वरात हर्षवर्धन यांनी नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com