गुजरात निवडणुकीच्या तोंडावर हार्दिक पटेल भाजपच्या गळाला; २ जून रोजी करणार प्रवेश

Hardik Patel | BJP : हार्दिक पटेल भाजपमध्ये करणार प्रवेश
Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in MarathiSarkarnama

(Hardik Patel Latest News)

गांधीनगर : काँग्रेसला नुकताच राम-राम केलेले पाटीदार नेते हार्दिक पटेल २ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ANI वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. मे महिन्यात काँग्रेस सोडल्यापासून ते भाजपमध्ये जाणार याबाबतच्या चर्चा सुरु होत्या. अखेरीस या चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत. दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना निवडणुकीत किंवा निवडणुकीनंतर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. (Hardik Patel to join BJP)

हार्दिक पटेल यांनी यापूर्वी १८ मे रोजी ट्विट करुन काँग्रेसची साथ सोडत असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.

यापूर्वीही हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर जाहीर टीका आणि भाजपच उघड कौतुक केले होते. तसेच त्यांच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या डीपीमुळेही चर्चांना अधिक हवा मिळाली होती. हार्दिक पटेलांच्या व्हॉट्सअ‍प आणि टेलिग्राम डीपीमधून काँग्रेस गायब झाले होते. त्याजागी भगवे वस्त्र परिधान केलेला फोटो आला होता. अलिकडेच त्यांच्या ट्विटर बायोमधूनही काँग्रेस गायब झाले होते. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आले होते.

गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नुकतेच राज्यात दाखल झाले होते. हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचे ताकदवान नेते आहेत. ते नाराज असल्याने पक्षातील मतभेद उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर खुद्द राहुल गांधी यांच्यासोबत हार्दिक पटेल मंचावर दिसले होते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात राहुल गांधींनी पटेल यांना भेट देणे टाळले होते. तसेच, त्यांच्याशी चर्चाही केली नव्हती. त्यामुळे हार्दिक यांची नाराजी कायम होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com