चिकन सँडविचपासून ते परदेश दौऱ्यापर्यंत! हार्दिक पटेलांनी राहुल गांधींना पाडलं उघडं

Hardik Patel | राजीनामा पत्रात भाजपचे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक
Rahul Gandhi and Hardik Patel, Hardik Patel Latest News in Marathi
Rahul Gandhi and Hardik Patel, Hardik Patel Latest News in MarathiSarkarnama

(Hardik Patel Latest News)

गांधीनगर : गुजरात काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी अखेर काँग्रेसला रामराम केला आहे. पटेल मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. आज ट्विट करुन त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी भाजपचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Hardik Patel resigns from Congress membership)

आपल्या ट्विटमध्ये हार्दिक पटेल म्हणाले, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन. (Hardik Patel resigns from Congress membership)

या ट्विटमधील राजीनामा पत्रात हार्दिक पटेल यांनी भाजपच्या अनेक निर्णयांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीरपणाचे जाहीर कौतुक केले आहे. सोबतच काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप आणि सडकून टीका केली आहे. यात त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. यात त्यांनी राहुल गांधी यांचे कुठेही नाव घेतले नसले तरी त्यांच्या टीकेचा रोख हा गांधी यांच्याकडेच होता.

Rahul Gandhi and Hardik Patel, Hardik Patel Latest News in Marathi
काँग्रेसला मोठा धक्का; अखेर हार्दिक पटेलांनी सोडली 'साथ'

हार्दित पटेल राजीनामा पत्रात काय म्हणाले?

हार्दिक पटेल म्हणाले, आज भारताला एका सक्षम आणि मजबूत नेतृत्वाची गरज आहे. मागच्या ३ वर्षांत मी एक गोष्ट बघितली की काँग्रेस पक्ष केवळ केंद्र विरोधाच्या राजकारणापर्यंतच मर्यादित राहिला आहे. आपल्याला एक असा पर्याय हवा आहे जो आपल्या भविष्याबाबत विचार करत असेल. ज्याच्यात देशाला पुढे घेवून जाण्याची क्षमता असेल. अयोद्धेमध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिर असो की जम्मू-काश्मिरचे कलम ३७० हटवणे असेल. किंवा जीएसटी लागू करणे असो. मागच्या अनेक दिवसांपासून देशाला ही सर्व काम हवी होती, पण काँग्रेस पक्ष यात केवळ अडथळे आणण्याचे काम करत होता. काँग्रेस पक्ष जनतेसमोर एक साधा रोडमॅप देखील घेवून जावू शकला नाही. (Hardik Patel Latest News)

काँग्रेसमध्ये प्रमुख नेतृत्वाकडे गांभीर्यतेचा आभाव हा एक महत्वाचा मु्द्दा आहे. मी जेव्हा केव्हा नेतृत्वाला भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाटलं की नेतृत्वाचे लक्ष गुजरातचे लोक आणि पक्षाच्या समस्या ऐकण्यापेक्षा त्यांच्या मोबाईलमध्ये आणि बाकी गोष्टींवरच जास्त आहे. देश संकटात होता किंवा काँग्रेसला जेव्हा नेतृत्वाची जास्त आवश्यकता होती तेव्हा आमचे नेते परदेश दौऱ्यात होते. नेतृत्वाचे वागणे म्हणजे गुजरातबद्दल आणि गुजरातच्या जनतेबद्दल त्यांना तिरस्कार वाटतो असे होते. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस त्यांच्याकडे पर्याय म्हणून बघवे ही अपेक्षा कशी काय करु शकते? (Hardik Patel resigns from Congress membership)

खूप दुःख वाटते की कोणी कार्यकर्ता स्वतःच्या खर्चाने दिवसभरात ५००-६०० किलोमीटरची रॅली करतो, जनतेमध्ये जातो. त्यावेळी तो बघतो की गुजरातचे मोठे नेते जनतेच्या मुद्द्यापासून दुर जातात आणि त्यांचे लक्ष केवळ याच गोष्टीवर असते की दिल्लीवरुन आलेल्या नेत्याला त्यांचे चिकन सँडविच मिळाले का? मी तरुणांच्या मध्ये गेलो तेव्हा मला सातत्याने एक प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही अशा पक्षात का आहात जिथे गुजराती लोकांचा केवळ आणि केवळ अपमान केला जात असावा? मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो. त्यामुळे काँग्रेस पक्षाने तरुणांचा विश्वासघात केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com