Hardik Patel | Congress
Hardik Patel | CongressSarkarnama

आधी काँग्रेसवर टीका मग भाजपचे कौतुक अन् आता भगवं वस्त्र : हार्दिक पटेल 'हात' सोडणार?

Hardik Patel | Congress | BJP : काँग्रेसमध्ये नव्या नव्याऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी अवस्था

गांधीनगर : गुजरात (Gujarat) काँग्रेसचे(Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेसवर जाहीर टीका आणि भाजपच उघड कौतुक केल्याने या चर्चांना सुरुवात झाली होती. पण त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली होती, अशातच आता हार्दिक पटेल यांच्या व्हॉट्स अॅप डीपीमुळे या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे.

हार्दिक पटेल यांनी नुकताच आपला व्हॉट्सअ‍ॅप डीपी (WhatsApp DP) बदलला आहे. त्यांच्या डीपीमधील फोटोमधून काँग्रेस गायब झाले असून त्याजागी भगवे वस्त्र परिधान केलेला फोटो आला आहे. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपसोबतच हार्दिक यांनी टेलिग्रामवरीलही फोटो बदलला आहे.

भाजपचे कौतुक करताना काय म्हणाले होते हार्दिक पटेल?

भाजपने मागील काही काळात घेतलेल्या निर्णय राजकीय हेतून घेतले आहेत. असे असले तरी त्यांच्यात निर्णय घेण्याची ताकद आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. भाजपची बाजू न घेता अथवा त्यांची स्तुती न करताही या सत्य गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात. गुजरातमध्ये काँग्रेसला भक्कम व्हायचे असेल तर आपण निर्णय क्षमता वाढवायला हवी.

Hardik Patel | Congress
पुन्हा पहिल्यासारखाच लालफितीचा कारभार! पूनावालांनी मोदी सरकारला सुनावलं

पटेल यांचे काँग्रेसवर आरोप :

पटेल यांनी नुकताच पक्षावर आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधून ते बाहेर पडू शकतात, अशी चर्चा गुजरातमध्ये सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

Hardik Patel | Congress
लालूंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; सुटकेचा मार्ग अखेर खुला

काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले होते की, मी आतापर्यंत पक्षासाठी १०० टक्के योगदान दिलं आहे. यापुढेही पक्षात काम करत राहीन. आम्ही गुजरातचा चांगला विकास करू. पक्षामध्ये काही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पण आम्हाला गुजराच्या विकासासाठी एकत्र राहून काम करायचे आहे, असं सांगत पटेल यांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com