भाजप सोडताच बड्या नेत्यानं काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याची मागितली शंभर वेळा माफी!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तराखंडमधील (Uttarakhand) राजकीय वातावरण तापले आहे.
Harak Singh Rawat Apologizes
Harak Singh Rawat Apologizes Sarkarnama

डेहराडून : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तराखंडमधील (Uttarakhand) राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग करणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यालाच भाजपने (BJP) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हरकसिंह रावत (Harak Singh Rawat) यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी थेट काँग्रेसच्या (Congress) माजी मुख्यमंत्र्यांची माफी मागितली आहे.

हरकसिंह रावत हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते हरीश रावत यांनी हरकसिंह यांनी माफी मागितल्यास त्यांना पक्षात परत घेण्यात येईल, अशी भूमिका घेतली होती. यानंतर हरकसिंह यांनी रावत यांची शंभर वेळा माफी मागत असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, हरीश रावत हे मला मोठ्या भावासारखे आहेत. मी त्यांची शंभरवेळा माफी मागतो. मला उत्तराखंडचा विकास हवा आहे. आज सकाळी मी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली आहे. ते लवकरच मला त्यांचा निर्णय कळवणार आहेत. त्यानंतर मी माझा निर्णय घेईन. (Harak Singh Rawat Apologizes)

हरकसिंह रावत यांनी 2016 मध्ये दहा आमदारांसह काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात त्यांनी बंड केले होते. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी दोनदा मुख्यमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त केली होती. पण दोन्हीवेळा त्यांना संधी मिळाली नाही. तेव्हापासून ते पक्षावर नाराज असल्याचे बोलले जाते.

Harak Singh Rawat Apologizes
करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे 'बिग बुल' बनून आला पोलिसांसमोर!

आगामी विधानसभा निवणुकीसाठी रावत यांनी आपल्यासह कुटुंबातील तिघांना पक्षाकडे तिकीट मागितले होते. पण पक्षाकडून त्यांना नकार देण्यात आला. त्यामुळे रावत नाराज झाले होते. तसेच त्यांच्या काँग्रेससोबतही चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत होते. त्यानंतर ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले होते. पण नेत्यांना भेटण्यापूर्वीच त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

Harak Singh Rawat Apologizes
राष्ट्रवादीच्या उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षांनी भातखळकर अन् सातपुतेंना पाडलं तोंडावर

भाजपमधून हकालपट्टी झाल्यानंतर हरकसिंह रावत म्हणाले होते की, मी तोंड उघडले तर विस्फोट होईल. उत्तराखंडमध्ये भाजपचा पराभव होणार आहे. कॉग्रेस बहुमत मिळणार असून कॉग्रेसची सत्ता येईल. मी ज्या दिवशी भाजपचा गैाप्यस्फोट करेल त्यादिवशी देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होईल. पक्ष सोडून न जाण्याविषयी मी अमित शहा यांना आश्वासन दिले होते. पण आता भाजप सोडल्यानंतर माझ्या मनावरील दडपण खूप कमी झाले आहे. मी अमित शहा यांना भेटणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com