बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघातात 3 ठार, 20 जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

बंगालमध्ये गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेसला (Guwahati-Bikaner Express) भीषण अपघात (Railway Accident) झाला आहे.
Guwahati-Bikaner Express Accident
Guwahati-Bikaner Express AccidentSarkarnama

जलपैगुडी : पश्चिम बंगालमध्ये (West Benal) गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस (Guwahati-Bikaner Express) लोहमार्गावर घसरून भीषण अपघात (Railway Accident) घडला आहे. या अपघातात रेल्वेचे 12 डबे लोहमार्गावरून घसरले आहेत. यात 3 जण ठार तर 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रूपयांची नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे.

प्रवाशांना रेल्वेच्या डब्यांखालून काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना मोयनागुडी येथील सरकारी रुग्णालयात नेले जात आहे. गंभीर जखमींना जलपैगुडीतील रुग्णालयात हलवले जात आहे. अनेक प्रवासी रेल्वे डब्यांखाली अडकले असून, या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) हे स्वत: परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. या अपघाताबद्दल आणि मदत कार्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली आहे. या अपघाताबद्दल अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसला दुर्दैवी अपघात घडला आहे. आज सायंकाळी हा अपघात घडला असून, रेल्वेचे 12 डबे लोहमार्गावरून खाली घसरले आहे. मी स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे.

Guwahati-Bikaner Express Accident
अखिलेश यांच्यानंतर जयंत चौधरींची फोडाफोडीत आघाडी..भाजपसह काँग्रेसला दे धक्का!

या अपघाताच्या चौकशीसाठी रेल्वेने उच्चस्तरीय समितीची घोषणा केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि महासंचालक (सुरक्षा) हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रूपयांची नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in