Gujrat Election : 69 आमदारांवर विजयाची मदार : मिशन गुजरातसाठी भाजपचा 'फाॅर्म्युला १७'!

Gujrat Election : ३ डझनहून अधिक आमदारांची तिकिटे कापण्यात आली!
Narendra Modi, Amit Shah Latest News
Narendra Modi, Amit Shah Latest NewsSarkarnama

गांधी नगर : गुजरात निवडणुकांसाठी 'फॉर्म्युला 17' चा वापर करण्याचा गुजरात भाजपने ठरवले आहे. पक्षाच्या आठ ज्येष्ठ नेत्यांनी नुकतंच पुन्हा निवडणूक न लढण्याची 'इच्छा' व्यक्त केली होती. अनेकांना कार्यमुक्त करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. पक्षाने जवळपास 69 विद्यमान आमदारांवर विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी ३ डझनहून अधिक आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी ते विद्यमान उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचा समावेश आहे.

पहिल्या यादीत एकूण 182 पैकी 160 उमेदवारांच्या नावांचा समावेश असून. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 84 उमेदवार आहेत. ते म्हणाले की, पक्षाने अनुसूचित जातीतील 13 उमेदवारांना तिकीट दिले आहे, तर अनुसूचित जातींचे 24 उमेदवार उभे केले आहेत. 14 जागांवर महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यातील ६९ उमेदवार विद्यमान आमदार आहेत. असे भूपेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Narendra Modi, Amit Shah Latest News
Pune University : पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप-महाविकास आघाडीत होणार थेट लढत!

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना घाटलोधिया मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार आंदोलनाचा चेहरा असलेला हार्दिक पटेल आणि क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांचीही नावे या यादीत आहेत. हार्दिक पटेल यांनी नंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेल विरमगाममधून तर रिवाबा जडेजा उत्तर जामनगरमधून निवडणूक लढवणार आहेत.

यादी जाहीर करताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, भाजपने 38 विद्यमान आमदारांना तिकीट दिलेले नाही. बहुतांश जागांवर विद्यमान आमदारांच्या संमतीनेच इतर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. पक्षाने 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 84 उमेदवारांची आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला 93 पैकी 76 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

भाजपच्या गुजरात कमिटिचे अध्यक्ष सीआर पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि मनसुख मांडविया यांनी बुधवारी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत निवडलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीत 69 विद्यमान आमदारांचा समावेश असल्याचे यादव म्हणाले. यावरून अनेक विद्यमान आमदारांना यावेळी तिकीट दिले नसल्याचे दिसून आले.

Narendra Modi, Amit Shah Latest News
CJI : धनंजय चंद्रचूड आजपासून नवे सरन्यायाधीश, अयोध्या वादासह 'हे' मोठे निर्णय त्यांनी दिले!

यादव म्हणाले की,'माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात त्यांनी पक्षाला पत्र लिहिले आहे.' गुजरातच्या आगामी निवजणूकीत भाजप जागा आणि मतांच्या टक्केवारीचा आतापर्यंतचा विक्रम मोडेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. 1995 पासून राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. या वेळेस सुद्धा भाजपचाच विजय होणार असा विश्वास आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in