Gujrat Election 2022 : गुजरात निवडणुकीतील पहिल्या फेरीत मतदानाचा टक्का घसरला, फटका कुणाला ?

Gujrat Election 2022 : यंदाच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे.
Gujrat Election News
Gujrat Election NewsSarkarnama

Gujrat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया गुरुवारी (दि.1) रोजी पार पडली. पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. यंदा पहिल्या फेरीसाठी सुमारे 60. 20 टक्के मतदान झालं आहे. आज झालेल्या मतदानात एकूण 39 पक्षांच्या 788 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मागील 2017 साली झालेल्या निवडणुकीत 68 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याने त्याचा फटका कुणाला बसणार याकडे सर्वाँचेच लक्ष लागलेले आहे. दुसर्या टप्प्यातील ऊर्वरित 93 जागांसाठी येत्या 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

गुजरातमध्ये एकूण दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. यापैकी गुरुवारी पहिल्या फेरीत सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिण भागातील १९ जिल्ह्यांमध्ये ८९ जागांसाठी हे मतदान (Voting) पार पडले. एकूण १४ हजार ३८२ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि सायंकाळी ५ पर्यंत मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या फेरीत ७८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (Gujrath Election 2022 latest news )

Gujrat Election News
Satara : शरद पवारांना 'जाणता राजा' पदवी दिली जाते, ते कुठे लढायला गेले होते... नरेंद्र पाटील

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात विधानसभा निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी उतरविली होती. यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी देखील प्रचारात आघाडी घेत भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. आता या निवडणुकीतील दुसर्या टप्प्यातील मतदान हे येत्या 5 डिसेंबरला होणार आहे.

Gujrat Election News
RSS Headquarters : संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा सीसी टीव्हीमुळे आला जाळ्यात...

भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्ष यांच्यासह ३६ अन्य राजकीय पक्ष गुजरात विधानसभेसाठी आपलं नशीब आजमावत आहेत. मतदार नेमकं कुणाच्या बाजूने कौल देतात हे 8 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपने २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील ८९ जागांपैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या वाट्याला ४० जागा आल्या आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या गुजरात निवडणुकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमित शाह यांच्यासह अरविंद केजरीवाल यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com