अहमद पटेलांची जागाही काँग्रेसला राखता आली नाही पण भाजपनं संख्याबळ वाढवलं!

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत गुजरातमधील दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. अहमद पटेलांची जागाही काँग्रेस वाचवू शकलानाही.
gujarat rajya sabha bypolls bjp two candidates win unopposed
gujarat rajya sabha bypolls bjp two candidates win unopposed

नवी दिल्ली : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत गुजरातमधील दोन्ही जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपचे दिनशाभाई अननवाडिया आणि रामभाई मोकारिया यांची राज्यसभेवर आज बिनविरोध निवड झाली. यामुळे वरिष्ठ सभागृहात भाजपचे संख्याबळ ९४ पर्यंत वाढले आहे. स्पष्ट बहुमतापासून भाजप दूर असला तरी सहकारी पक्षांच्या मदतीने नरेंद्र मोदी सरकारची कळीची विधेयके मंजूर करण्यातील आणखी एक अडचण दूर झाली आहे. यातील एक जागा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाने रिक्त झाली होती. तीसुद्धा काँग्रेसला राखता आली नाही. 

भाजपचे दिनशाभाई अननवाडिया आणि रामभाई मोकारिया यांची राज्यसभेवर आज बिनविरोध निवड झाली. राज्यसभेत बहुमतापासून भाजप आता किमान १४ जागांनी दूर आहे. मात्र, भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) व अण्णाद्रमुक, बिजू जनता दलासारख्या मित्रपक्षांचे मिळून  राज्यसभेत स्पष्ट बहुमत झाल्याने नरेंद्र मोदी सरकारची कळीची विधेयके मंजूर करण्यातील अडचण दूर झाली आहे. 

संख्याबळाच्या बाबतीत राज्यसभेत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून, त्यांचे ३६ सदस्य आहेत. हे संख्याबळ एनडीएच्या तुलनेत एक तृतीयांश आहे. राज्यसभेतील मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची राज्यसभेची जागाही वाचवू शकला नाही. पटेल यांची ही जागा 1993 पासून त्यांच्या निधन 25 नोव्हेंबर 2020 रोजी होईपर्यंत त्यांच्याकडे होती. पटेल यांची मुदत २०२३ पर्यंत होती. पटेल व भाजपचे अभय भारद्वाज यांच्या निधनामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. 

गुजरातच्या १८२ सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे १११ व काँग्रेसचे ६५ आमदार आहेत. भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने काँग्रेसने या जागांसाठी उमेदवारच दिले नव्हते. याचवेळी भाजपने दोन डमी उमेदवारही उभे केले होते. भाजपचे रजनीकांत पटेल आणि किरीट सोलंकी यांनी माघार घेतल्याने इतर दोन उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com