बड्या नेत्याच्या घोषणेने काँग्रेसची अडचण; पक्ष प्रवेशाची भूमिका बदलत ऐनवेळी टाकली गुगली

Congress | Naresh Patel | Gujrat |: काँग्रेस या नेत्याला पक्षात घेण्यास मागच्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होती...
बड्या नेत्याच्या घोषणेने काँग्रेसची अडचण; पक्ष प्रवेशाची भूमिका बदलत ऐनवेळी टाकली गुगली
Congress Latest Marathi News, Congress News, Rajya Sabha Election NewsSarkarnama

गांधीनगर : गुजरातमधील पाटीदार नेते नरेश पटेल (Naresh Patel) यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेशाची भूमिका बदलत काँग्रेसला (Congress) अक्षरशः तोंडावर पाडले आहे. आपण सध्यातरी सक्रिय राजकारणात उतरणार नाही, अशी गुगली टाकत नरेश पटेल यांनी काँग्रेसची मोठी अडचण केली. काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पाटीदार नेते म्हणून नरेश पटेल यांना पक्षात घेण्यास काँग्रेसचे नेते इच्छूक होते. (Naresh Patel | Congress Latest News)

नरेश पटेल हे गुजरातमधील मोठे पाटीदार नेते मानले जातात. शिवाय कोडलधाम मंदिर ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. जवळपास सहा महिन्यांपासून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू होती. त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला खुद्द प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनीही दुजोरा दिला होता. नरेश पटेल यांचे पक्षात कधीही स्वागत असेल, अशी भूमिका ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती.

नरेश पटेल म्हणाले, ट्रस्टच्या एका समितीने आपल्या राजकीय प्रवेशाबद्दल जनमत जाणून घेण्यासाटी एक सविस्तर सर्वेक्षण केले आहे. यात जवळपास ८० टक्के युवक आणि ५० टक्के महिला आपण राजकारणात यावे या मताच्या आहेत. मात्र १०० टक्के वृद्ध लोकांचे मत आपल्या राजकीय प्रवेशाच्या विरोधात आहे. त्यामुळे मी माझा राजकीय प्रवेशाचा विचार कायमस्वरुपी गुंडाळून ठेवला आहे

पाटीदार समाजाच्या वृद्ध आणि अनुभवी लोकांनी मी राजकारणात गेल्यास सर्व समाजाला न्याय देवू शकणार नाही, असे मत आहे. शिवाय शिक्षण, आरोग्य आणि कृषी अशा सामाजिक व्यवस्थेशी संबंधित कोडलधामच्या अनेक योजना अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. सर्वात आधी या सर्व योजन पूर्ण करणे हे आपले उद्दिष्ट्ये आहे. या गोष्टी मी लक्षात घेवून माझा राजकीय प्रवेशाचा निर्णय मागे घेत आहे, असेही पटेल म्हणाले.

यावेळी, नरेश पटेल यांनी आगामी काळात राजकारणात जावू इच्छिणाऱ्या सर्व समुदायाच्या तरुणांसाठी खोडलधाम परिसरात ‘खोडलधाम राजकीय प्रशिक्षण अकादमी'ची स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in