पंचायत समितीत बहुमत भाजपचं अन् सभापती 'आप'चा!

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने बहुतेक ठिकाणी वर्चस्व मिळविले आहे. मात्र, काही ठिकाणी भाजपला फटका बसला आहे.
in gujarat jesar taluka pachayat samiti aap candidate will be president
in gujarat jesar taluka pachayat samiti aap candidate will be president

अहमदाबाद : गुजरातमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 31 जिल्हा परिषदांत भाजपने बहुमत मिळवले आहे. याचबरोबर 231 पैकी 196 पंचायत समित्यांमध्ये भाजपने झेंडा फडकावला आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षानेही (आप) अस्तित्व दाखवून दिले आहे. जेसर पंचायत समितीत भाजपचे बहुमत असताना सभापती मात्र, 'आप'चा होणार आहे. 

गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले आहेत. सहाही महापालिकांमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला तर, 'आप'ने सुरत महापालिकेत जोरदार एंट्री केली. रविवारी गुजरातमधील 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषदा आणि 231 पंचायत समित्यांची निवडणूक झाली. 

महापालिका निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर भाजपने गुजरातमधील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसला धोबीपछाड केले आहे. राज्यात भाजपने ग्रामीण भागातही आपला वरचष्मा असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे. भाजपने  सर्वच्या सर्व 31 जिल्हा परिषदा, 231 पैकी 196 पंचायत समित्या आणि 81 पैकी 74 नगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसने केवळ एक नगरपालिका आणि 18 तालुका पंचायती जिंकल्या आहेत. 'आप' आणि एआयएमआयएमनेही आपले अस्तित्व या निवडणुकीत दाखवून दिले आहे. 

भावनगर जिल्ह्यातील जेसर तालुका पंचायत समितीतही भाजपने मोठा विजय मिळवला आहे. या पंचायत समितीतील 16 पैकी 12 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली तर 'आप'ला तीन जागा मिळाल्या. आज जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. जेसर पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाले आहे. 

जेसर पंचायत समितीत केवळ 'आप'चा अनुसूचित जातीचा उमेदवार निवडून आला आहे. त्यांचे नाव अतुल नारायण असे आहे. त्यामुळे तेच सभापती असतील हे निश्चित झाले आहे, अशी माहिती 'आप'चे प्रवक्ते टुली बॅनर्जी यांनी दिली. भावनगरचे जिल्हाधिकारी गौरांग मकवाना यांनीही जेसर पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यास दुजोरा दिला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com