Gujarat Hooch Tragedy विषारी दारु प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू: 15 जणांची प्रकृती गंभीर

Gujarat Hooch Tragedy| गुजरातमध्ये दारुबंदी आहे, पण देशात बनवलेल्या विदेशी दारूला परवानगी
Gujarat Hooch Tragedy|
Gujarat Hooch Tragedy|

अहमदाबाद : दारुबंदी असलेल्या गुजरातमधील बोटाडमध्ये विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही गंभीर आहे. या प्रकरणी गुजरात पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे. एसआयटीशिवाय गुजरात एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Gujarat Hooch Tragedy)

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे भाजपवर विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहे. गुजरातमध्ये दारू बंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू पिऊन मृत्यू कसे होतात, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. ड्राय स्टेटमध्ये दारू विक्री करणाऱ्यांना राजकीय संरक्षण आहे. अशा विषापी दारू विक्रीचा पैसा जातो कुठे, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

Gujarat Hooch Tragedy|
शिवसेनेत प्रत्येकवेळी विश्वासघाताचं राजकारण का झालं ? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं....

गुजरातमध्ये दारूवर बंदी असली तरी परमिटच्या जोरावर अनेक जण दारू पीत आहेत आणि इतरांनाही ही विषारी दारु पाजली जात आहे. धक्कादायक म्हणजे गुजरातमध्ये दारू बंदी असताना सरकारच्या आरोग्य विभागाने हे परमिट दिले आहे. आरोग्याचा संदर्भ देत, तुम्ही देशी बनावटीची विदेशी दारू म्हणजे देशात बनलेली विदेशी दारू पिऊ शकता. या परवानगीमुळे त्यांचे दारू पिणे कायदेशीर ठरते.

आकडेवारीनुसार हेल्थ परमिटच्या नावाखाली अहमदाबादमध्येच सर्वाधिक मद्यप्राशन केले जात आहे. सध्या 13034 लोक हेल्थ परमिटच्या आधारे दारूचे सेवन करतात. सुरतमध्ये सध्या 8054 जण हेल्थ परमिटचा वापरत आहेत. या सर्वांशिवाय महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्येही आरोग्य परवाने असलेले 1989 लोक आहेत. सर्वात कमी आरोग्य परवानग्या असलेला जिल्हा हा डांग आहे. आकडेवारी पाहिली तर, एकूण 70 टक्के लोक हेल्थ परमिट असलेले लोक हे राज्याच्या अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोट या चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये आहेत.

ग्रामीण भागातील लोक गावातच देशी दारू बनवतात. गावात छुप्या हातभट्ट्या बनवतात आणि तिथे दारू बनवली जाते. दारूची नशा वाढवण्यासाठी त्यात केमिकल मिसळून ते स्वतः दारू पिऊन गावातील लोकांनाही विकतात. हे काम गुप्तपणे केले जाते. राजस्थान आणि हरियाणामधून इंग्रजी दारूची तस्करी सर्वाधिक होते. दारूच्या तस्करीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस तेथे असतात. गुजरातमध्ये स्टेट मॉनिटरिंग सेलची स्थापना करण्यात आली आहे. गुजरातमध्ये नियमानुसार पर्यटकही दारू पिऊ शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com