गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार; मोदी-शहांच्या होमपिचकडे देशाचे लक्ष

केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Gujarat, Himachal Pradesh News
Gujarat, Himachal Pradesh NewsSarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे होम पिच असलेले गुजरात (Gujarat) आणि भाजपचीच (BJP) सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधान सभा निवडणुकाचा बिगूल आज वाजणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Gujarat, Himachal Pradesh assembly elections to be announced?)

गुजरात विधानसभेची निवडणूक एक महिना अगोदर होण्याची शक्यता सूत्रांकडून मिळाली आहे. ती नोव्हेंबरअखेर होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नेहमी ती डिसेंबरअखेर होत असते. गुजरातमध्ये तब्बल २४ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामागे अर्थात नरेंद्र मोदी कार्ड असल्याचे संपूर्ण देश जानतो. त्यांच्या सोबतीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे डावपेचही महत्वाचे ठरले आहेत.

Gujarat, Himachal Pradesh News
एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला जोरदार धक्का : ठाण्यातील बडा मासा लावला गळाला

दरम्यान, मागील निवडणुकीत हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भाजपला शंभरच्या आतमध्ये रोखले होते. त्या निवडणुकीत ९९ जागा भाजपला, तर काँग्रेस पक्षाने ७७ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचा वारू काँग्रेस आणि आम आदमी पक्ष रोखणार का, याकडे देशाचे लक्ष असणार आहे. गुजरात विधानसभेत १८२ जागा असून ९२ हा बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे तिथपर्यंत कोण पोहचणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

Gujarat, Himachal Pradesh News
‘रश्मी शुक्लांनी ६८ दिवस माझा फोन टॅप केला : फडणवीसांना भेटल्या त्याच दिवशी त्यांना क्लीनचिट’

गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या ६८ विधानसभा जागांसाठी मतदानाची होणार आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वात हिमाचलमध्ये भाजपची सत्ता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १९९० पासून कोणत्याही पक्षाला आत्तापर्यत सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करता आलेली नाही. प्रत्येक निवडणुकीत येथे सत्ताबदल झालेला आहे. याच कारणामुळे येथे सत्ता कायम राखण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.

Gujarat, Himachal Pradesh News
जानकरांनी वाढविले भरणेंचे टेन्शन : राष्ट्रवादीचे प्रवीण माने इंदापूरमध्ये रासपचे उमेदवार?

मागील २०१७ च्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला ४४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस पक्ष जेमतेम २१ पर्यंत पोहचला होता. सीपीएम एक आणि अपक्षांनी दोन जागा जिंकल्या होत्या. आजपर्यंतच इतिहास काँग्रेस खरा करून दाखविणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com