Gujarat Assembly Elections : बाप-लेक आमनेसामने ; BTP च्या संस्थापकाचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल

Gujarat Assembly Elections 2022 : छोटू वसावा यांनी या मतदार संघातून अनुसूचित जाती-जमातीचे सात वेळा प्रातिनिधित्व केलं आहे. आदिवसींचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
Gujarat Assembly Elections 2022
Gujarat Assembly Elections 2022sarkarnama

भरुच (गुजरात) : गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून भाजप,काँग्रेस,आप आदमी पार्टीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यंदा प्रथमच आपने गुजरातच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. या निवडणुकीत बाप-लेक एकमेकांच्या विरोधात निवडणुक रिंगणात उतरले आहेत. (Gujarat Assembly Elections 2022 news update)

भारतीय ट्राइबल पार्टी (BTP)चे संस्थापक छोटू वसावा यांनी गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील झगड़िया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघातून बीटीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश वसावा हे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. झगडिया मतदारसंघातून विजयी कोण होईल, हे एक डिसेंबर रोजी समजेल. छोटू वसावा यांनी या मतदार संघातून अनुसूचित जाती-जमातीचे सात वेळा प्रातिनिधित्व केलं आहे. आदिवसींचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

Gujarat Assembly Elections 2022
Nawab Malik : नवाब मलिकांच्या अडचणी कमी होईना ; आणखी एक गुन्हा दाखल

आपल्या उमेदवारी अर्जाबाबत छोटू वसावा म्हणाले, "सत्ताधारी भाजपला ठक्कर देण्यासाठी मी ही निवडणूक लढवित आहे. एकाच परिवारातील चार जण निवडणूक लढवू शकतात. येत्या निवडणुकीत राज्यातून अन् देशातूनही भाजपचा पराभव होणार आहे, मला माझ्या विजयाची पूर्ण खात्री आहे,"

गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय ट्राइबल पार्टीने (BTP) तीन जागांवर निवडणूक लढवली होती. यात छोटू वसावा हे झगड़िया विधानसभा येथून विजयी झाले होते, तर महेश वसावा हे देदियापाड़ा विधानसभेतून विजयी झाले होते. २०२० मध्ये राज्यसभा निवडणुकीत या दोन्ही पिता-पुत्रांनी मतदान केले नव्हते. त्यानंतर स्थानिक निवडणुकीत त्यांनी काँग्रेससोबत युती केली होती. गेल्या मे महिन्यात त्यांनी आपसोबत युती केली होती. त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत रॅलीतही सहभाग घेतला होता. त्यानंतर आता ते आपसोबत नसून स्वतंत्र्यपणे लढत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com