Gujrat Election : गुजरात सोडण्यासाठी आम आदमी पक्षाला भाजपची 'ही' ऑफर!

Gujrat Election : भाजपाचीच बनावट स्क्रिप्ट असल्याचा दावा!
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsarkarnama

गुजरात (गांधीनगर ) : गुजरात निवडणुका जाहीर झाल्यापासून सगळ्याच पक्षांनी आपली राजकीय रणनीती तयार करताना दिसत आहेत. 'आप'ने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे, तर काँग्रेसने काही जागांवरील उमेदवार जाहीर केले आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चांगली लढत दिली होती. आताची निवडणुकीत सत्तेत असलेल्या भाजपसमोर काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षाचे मोठे आवाहन असणार आहे. एकीकडे निवडणुकांची लगबग सुरू असताना, या सर्व घडामोडींवर दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

तुम्ही गुजरात सोडून जा, आम्ही सत्येंद्र जैनला सोडू अशी ऑफर आपल्याला भाजपाने दिल्याचा धक्कादायक व गंभीर आरोप केजरीवालांनी भाजपवर केला आहे. सत्येंद्र जैन यांच्यावर लावलले आरोप भाजपाचीच बनावट स्क्रिप्ट आहे. मोरबी पूल दुर्घटना प्रकरणावरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी भाजपानेच हे षडयंत्र रचल्याचे केजरीवालांनी सांगितले.

Arvind Kejriwal
'आप'ला रोखण्यासाठी प्लॅन ठरला! 'विहिंप'सह संघपरिवारातील ५ हजार पथके मैदानात...

भाजपाने गुजरातमध्ये सत्तेत असताना काही काम करून दाखवले असतं, तर या ठिकाणी २७ वर्षांनंतर आम्हाला राजकीय जमीन मिळाले नसते. केजरीवाल म्हणजे गुजरातच्या लोकांचे भाऊ झाले आहेत. गुजराती लोकांच्या कुटुंबाचा मी देखील एक भाग बनलो आहे, असेही केजरीवाल म्हणाले.

Arvind Kejriwal
भाजपने डाव साधला; अरविंद केजरीवालांना दिल्लीतच गुंतवून ठेवले

यावेळी केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पक्षही गुजरातमध्ये पूर्ण शक्तीने उतरणार. आम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून इसुदान गढवी यांचे नाव जाहीर केले आहे. या निवडणुकीत आपकडून ओटीपी ( OTP) फॉर्म्युलावर भर देण्यात येणार असल्याचे समजते. ओटीपी म्हणजेच ओबीसी, ट्रायबल आणि पाटीदार यांच्या मतांची मोट आहे. आपने ओबीसी वर्गाला प्रतिनिधित्व म्हणून ओबीसी मुख्यमंत्री म्हणून चेहरा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in