Gujrat Election : 10 लाख नोकऱ्या, 300 युनिट वीज मोफत : गुजरातसाठी काँग्रेसचा जाहीरनामा!

Gujrat Election : महिलांना 500 रुपयांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात देईल,
Gurjrat Election
Gurjrat Election Sarkarnama

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, रघु शर्मा, गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकूर आणि पवन खेडा यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. जाहीरनाम्यात पक्षाने गुजरातच्या जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. 3000 रुपये बेरोजगार भत्ता, जुनी पेन्शन लागू, 10 लाखांपर्यंत मोफत उपचार, वीज बिल माफ इत्यादी आश्वासनांची खैरात आहेत.

Gurjrat Election
मोठी बातमी : Jitendra Awad यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

महागाईच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना 500 रुपयांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात देईल, असे सांगत आहे. तसेच 300 युनिटपर्यंत विजेच्या वापरासाठी कोणतेही बिल भरावे लागणार नाही. पक्ष युवकांना 3000 रुपये बेरोजगारी भत्ता देणार आहे. याशिवाय 10 लाख रिक्त सरकारी आणि निमशासकीय पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सवलतीत शिक्षण दिले जाईल.

Gurjrat Election
Chief Justice : यु.यु.ललित आजपासून देशाचे 49 वे सरन्यायाधीश

गुजरातसाठी काँग्रेसचा संकल्प ;

*सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी पद्धत संपवणार -

*10 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणार -

*3000 रुपये बेरोजगार भत्ता -

*गॅस सिलिंडर 500 रुपयांना -

*300 युनिट वीज मोफत -

*जुनी पेन्शन लागू -

*10 लाखांपर्यंत मोफत उपचार -

*शेतकऱ्यांचे तीन लाखांचे कर्ज माफ, वीज बिल माफ -

*दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान -

*3000 सरकारी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडणार -

*4 लाख रुपये कोविड नुकसानभरपाई -

*मनरेगा योजनेसारखी शहरी रोजगार हमी योजना -

*इंदिरा योजना -

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in