हिंदू अल्पसंख्य झाल्यास काही शिल्लक राहणार नाही; गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांचे विधान

हिंदू अल्पसंख्याक ठरले तर न्यायालये, लोकसभा, राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षता यांची कुणी चर्चाही करणार नाही.
gujarat deputy chief minister nitin patel creates controversy
gujarat deputy chief minister nitin patel creates controversy

अहमदाबाद : हिंदू (Hindu) बहुसंख्य असेपर्यंतच देशात राज्यघटना, लोकसभा, कायदा आणि धर्मनिरपेक्षता आदी मुद्द्यांवर चर्चा होईल. परंतु, हिंदू अल्पसंख्याक ठरले तर न्यायालये, लोकसभा, राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षता यांची कुणी चर्चाही करणार नाही, असे विधान गुजरातचे (Gujarat) उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. 

राज्यातील पहिले भारत माता मंदिर गांधीनगर येथे उभारण्यात आले आहे. या मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना आज करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषदेने केले होते.  बोलताना पटेल यांनी हे विधान केले. या वेळी गृह राज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा, परिषदेचे अनेक वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही वरिष्ठ नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना पटेल यांनी वरील वादग्रस्त विधान केले. 

पटेल म्हणाले की, आपल्या देशात हिंदू बहुसंख्य असेपर्यंतच राज्यघटना, कायदे, धर्मनिरपेक्षता यावर लोक चर्चा करत राहतील. परंतु, मला तुम्हाला एक सांगायचे आहे, हवे तर तुम्ही व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता. माझे शब्द तुम्ही लिहून घ्या. राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, कायदा आदी गोष्टींवर बोलणारे हे हिंदू बहुसंख्य असेपर्यंतच बोलतील. हिंदूंची संख्या घटेल त्या दिवशी धर्मनिरपेक्षता, लोकसभा, राज्यघटना या गोष्टी नसतील. सर्व गोष्टी हवेत विरल्या जातील अथवा जमिनीत गाडल्या जातील. काहीच शिल्लक राहणार नाही. 

मी हे विधान मुस्लिम अथवा ख्रिश्‍चन यांच्याबाबत केले नसून, त्यांच्यातील बहुतांश लोक देशभक्त आहेत. लाखो, हजारो मुस्लिम आणि ख्रिश्‍चन हे देशभक्त आहेत. देशाचे लष्कर आणि गुजरात पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम आहेत. ही सगळी मंडळी देशभक्त आहेत. मी केलेले विधान हे देशभक्त नसलेल्या लोकांबाबत आहे, असे पटेल यांनी सांगितले. 

गुजरात सरकारने धार्मिक स्वातंत्र्य (सुधारणा) कायदा-२०२१ तयार केला आहे. याला जमियत उलेमा ए हिंद आणि अन्य मुस्लिम संघटनांनी विरोध केला आहे. याबद्दल पटेल यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, बळजबरीने एखाद्याचे धर्मांतर केले जात असेल तर त्याला रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आला. असे असतानाही त्याला झालेला विरोध हा माझ्या आकलनाबाहेरचा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com