गुजरातमध्ये काँग्रेसला दुसरा धक्का! हार्दिक पटेल यांच्यानंतर आणखी एका नेत्याचा रामराम

तेराशे कार्यकर्त्यांसह काँग्रेस नेत्याच्या भाजपमध्ये प्रवेश
Keval Joshiyara joins BJP
Keval Joshiyara joins BJP Sarkarnama

गांधीनगर : गुजरात (Gujarat) काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी नुकताच पक्षाला रामराम केला आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. असे असतानाच काँग्रेसला आता आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे बडे आदिवासी नेते व दिवंगत आमदार अनिल जोशीयारा यांचे पुत्र केवल जोशीयारा (Keval Joshiyara) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यांच्यासमवेत तेराशे कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. (Hardik Patel Latest Marathi News)

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला आदिवासी पट्ट्यात मोठा फटका बसला होता. या पट्ट्यात 27 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. यातील तब्बल 15 जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या तर भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या भारतीय आदिवासी पक्षानंही 2 जागा जिंकल्या होत्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार मोधवा हदाफ निवडून आले होते. आता भाजपने आदिवासी पट्ट्यातील जागांवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. मागील विधानसभा निवडणुकीपासून 13 विद्यमान व माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात आता केवल जोशीयारा यांचा समावेश झाला आहे.

Keval Joshiyara joins BJP
भाजप नेत्याच्या याचिकेवर उच्च न्यायालय म्हणाले, हा तर पब्लिसिटी स्टंट!

अनिल जोशीयारा हे अरवली जिल्ह्यातील भिलोदा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले होते. या आदिवासी पट्ट्यात त्यांचा मोठा प्रभाव होता. मागील वर्षी मार्च महिन्यात त्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. जोशीयारा पहिल्यांदा 1995 मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभा जिंकले होते. शंकरसिंह वाघेला हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये 1996-1997 मध्ये आरोग्यमंत्री होते. आता त्यांचे पुत्र केवल हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Keval Joshiyara joins BJP
येडियुरप्पांच्या मुलाला डावललं पण सातच दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या नेत्याला संधी

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्याआधी हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सोडल्यानं पक्षाला धक्का बसला आहे. हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचे ताकदवान नेते आहेत. ते नाराज असल्याने पक्षातील मतभेद उघड झाले होते. काही दिवसांपूर्वी पटेल यांनी पक्षात दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. नंतर मात्र, त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com