कधीकाळी काँग्रेसने जिद्दीने जिंकलेली लढाई आता महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरलीय

Congress | BJP | Rajya Sabha Election : याच लढाईचा संदर्भ देत भाजपने राज्यसभेची मतमोजणी रोखून धरली आहे.
Rajya Sabha Election
Rajya Sabha Election sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचे (Rajya Sabha Election) मतदान पूर्ण होऊन जवळपास तीन तास उलटले तरी अद्याप मतमोजणीला सुरूवात झालेली नाही. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदानावर आक्षेप भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे त्यावर निर्णय होईपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. (Rajya Sabha Election 2022 News)

राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपने घेतलेला आक्षेप फेटाळून लावला होता. पण त्याविरोधात भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यानुसार आता आयोगाने ही तक्रार दाखल करून घेत तिघांच्या मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरण तसेच निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवाल मागवून घेतला आहे. यामुळे आघाडी सरकार निवडणूक आयोग काय निकाल देते याकडे डोळे लावून बसली आहे. (Rajya Sabha Election 2022 News)

दरम्यान भाजपने ज्या प्रकरणाचा हवाला देत आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेवून महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविले आहे, कधीकाळी त्याच प्रकरणात काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिले होते, आणि अमित शहा यांच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला होता.

नेमके काय झाले होते गुजरातमध्ये?

२०१७ मध्ये गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांवर निवडणूक झाली होती. यात विधानसभेतील संख्याबळानुसार दोन जागांवर भाजपचा आणि एका जागेवर काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात होता. भाजपकडून स्वतः अमित शहा आणि स्मृती इराणी मैदानात होत्या तर काँग्रेसकडून अहमद पटेल उमेदवार होते.

भाजपने ऐनवेळी पटेल यांच्याविरोधात तिसरा उमेदवार देत बलवंत राजपूत यांना उभे केले. विजयासाठी ४७ मतांची आवश्यकता होती. अशात काँग्रेसकडे विजयासाठी आवश्यक मत होती पण ऐनवेळी काँग्रेला गळती लागण्यास सुरुवात झाली. तब्बल १७ वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या शंकरसिंह वाघेला यांनी २ आमदारांना सोबत घेत काँग्रेस सोडली. त्यानंतर दोन दिवसांच्या आत आणखी ३ आमदारांनी काँग्रेसचा हात सोडला. त्यामुळे आमदारांची संख्या १७६ वर आली आणि विजयाचा कोटा ४५ पर्यंत खाली घसरला. (Gujrat Rajya Sabha Election 2017 News)

काँग्रेसला हे झटके बसत असतानाच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल (संयुक्त) ने काँग्रेसची साथ सोडली. त्यामुळे काँग्रेसकडे केवळ ४४ मत शिल्लक राहिली. धोका ओळखत काँग्रेसने आपल्या आमदारांना रिसॉर्टवर पाठवण्यात आले. यानंतर भाजपने आपले डाव टाकायला सुरुवात केली, अमित शहा स्वतः गुजरातमध्ये आले.

मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या एका आमदाराने क्रॉस व्होटिंग केले. मात्र काँग्रेसच्या करड्या नजरेतून ही घटना सुटली नाही. काँग्रेसने आरोप केला की, त्यांच्या दोन आमदारांनी मत दिल्यानंतर बुथ बाहेर उभ्या असलेल्या अमित शहा यांना विजयाचे चिन्ह दाखविले. त्यामुळे ते मत रद्द करण्यात यावे. या घटनेवर भाजप आणि काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आणि दोघांनी रात्री उशिरा निवडणूक आयोगाचे दार ठोठावले. (Gujrat Rajya Sabha Election 2017 News)

भाजपकडून अरुण जेटली, रविशंकर प्रसाद आणि पियुष गोयल सारखे दिग्गज पोहचेल. तर काँग्रेसकडून कपिल सिब्बल, रणदीप सुरजेवाला यांच्यासह अन्य दुसरे नेते उपस्थित होते. रात्री उशिरा पर्यंत सुनावणी झाली आणि मध्यरात्री निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या बाजूने निकाल दिला. दोन्ही आमदारांची मत बाद ठरविण्यात आली. त्यामुळे एकूण मतांची संख्या १७६ वरून १७४ झाली. तर विजयाचा कोटा ४३.५१ झाला. मध्यरात्री दिड वाजता पुन्हा मतमोजणी सुरु झाली आणि काँग्रेसला फायदा झाला. मध्यरात्री २ वाजता अहमद पटेल यांना विजयी घोषित करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com