जम्मू-काश्मीरमध्ये कॉग्रेसला मोठा धक्का ; महाराजा हरि सिंह यांच्या नातूचा राजीनामा

''कॉग्रेस पक्ष जम्मू-काश्मिरच्या जनतेच्या भावना समजू शकल्या नाहीत, त्यांचा अपेक्षा पूर्ण करण्यास कॉग्रेस पक्ष अपयशी ठरला आहे,''
vikramaditya singh
vikramaditya singhsarkarnama

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये कॉग्रेसला (congress jammu kashmir) मोठा धक्का बसला आहे. दिवंगत महाराज हरि सिंह ( hari singh) यांचे नातू विक्रमादित्य सिंह (vikramaditya singh) यांनी कॉग्रेसचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी कॉग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २०१९ च्या निवडणुकीत उधमपूर पश्चिममधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला आहे.

vikramaditya singh
Prajwala Scam:भाजपला झटका ; ठाकरे सरकार करणार विजया रहाटकरांची चैाकशी

''कॉग्रेस पक्ष जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या भावना समजू शकल्या नाहीत, त्यांचा अपेक्षा पूर्ण करण्यास कॉग्रेस पक्ष अपयशी ठरला आहे,'' असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे. २०१८ मध्ये त्यांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना जम्मू -काश्मिरच्या अनेक राष्ट्रीय मुद्दांवर आवाज उठविला. पण कॉग्रेसची भूमिका त्याला प्रतिकूल होती. त्यांनी बालाकोट सर्जिकल स्ट्राईक, जम्मू काश्मिरमध्ये 'विलेज डिफेंस कमिटीज' चे पुननर्विकास, कलम ३७० आदी विषयावर कॉग्रेस विरोधी भूमिका घेतली होती.

विक्रमादित्य सिंह यांचे वडील कर्ण सिंह यांचे काश्मिरच्या सार्वजनिक जीवनात मोठे योगदान राहिले आहे. कर्ण सिंह तीन वेळा बनारस विद्यापीठाचे कुलगुरु होते. राज्यसभा खासदार, 'इंडिया इंटरनेशनल सेंटर'चे अध्यक्ष राज्यपाल आदी पदावर त्यांनी काम केले आहे. ते कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यापैकी एक आहेत.

vikramaditya singh
हिमंत असेल तर ‘द महाराष्ट्र फाईल्स’बनवा ; मोहित कंबोजांचे थेट बॅालिवुडला आव्हान

विक्रमादित्य सिंह हे हिमाचल प्रदेश येथील कांगडा येथील "तारागढ पँलेस होटल'चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. 'यूनिवर्सिटी ऑफ साउथर्न कैलिफोर्निया’ येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. माधवराव शिंदे यांचे मुलगी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची बहिण चित्रांगदा यांच्याशी त्यांचा १९८७ मध्ये विवाह झाला आहे. त्यांची मुलगी मृंगाका हीचा विवाह पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नातूशी सोबत झाला आहे.

देशात झपाट्याने बदल होत आहे. हा बदल जो पक्ष स्वीकार करणार नाही, तो नामशेष होऊ शकतो. विक्रमादित्य सिंह यांचे वडील कर्ण सिंह यांचे काश्मिरच्या सार्वजनिक जीवनात मोठे योगदान राहिले आहे. कर्ण सिंह तीन वेळा बनारस हिंदू विश्वविद्यालयचे कुलगुरु होते. राज्यसभा खासदार, 'इंडिया इंटरनेशनल सेंटर'चे अध्यक्ष राज्यपाल आदी पदावर त्यांनी काम केले आहे. ते कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यापैकी एक आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com