अंबानी अन् संघाच्या नेत्यांकडून तीनशे कोटींची ऑफर! राज्यपालांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष सुरू आहे. याचबरोबर इतरही राज्यांत असाच संघर्ष सुरू आहे.
Narendra Modi and Satyapal Malik
Narendra Modi and Satyapal MalikSarkarnama

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष सुरू आहे. याचबरोबर इतरही राज्यांत असाच संघर्ष सुरू आहे. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करीत आहेत. आता त्यांनी मोठा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. अंबानी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याकडून दीडशे-दीडशे कोटींची ऑफर होती, असा दावा त्यांनी केला आहे.

सत्यपाल मलिक (Satyapal Malik) हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल (Governor) होते. त्यावेळी दोन फायलींवर सह्या करण्यासाठी त्यांना तीनशे कोटींच्या लाचेची ऑफर देण्यात आली होती. ही लाच घेण्यास नकार देत त्यांनी दोन्ही फायलींवर सह्या केल्या नव्हत्या. खुद्द मलिक यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी जम्मू-काश्मीरचा राज्यपाल असताना माझ्याकडे दोन फायली आल्या होत्या. यातील एक फाईल अंबानींशी निगडित होती. दुसरी फाईल ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बडे नेते आणि तत्कालीन मेहबूबा सरकारमधील मंत्र्यांशी निगडित होती. हा नेता नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) जवळचा होता. या दोन्ही फायलींमध्ये अनियमितता असून, त्यावर सह्या केल्यास प्रत्येकी दीडशे-दीडशे कोटी रुपये मिळू शकतात, असे मला माझ्या सचिवांनी सांगितले होते. मात्र, मी या फायलींतील दोन्ही प्रस्ताव नामंजूर केले होते.

Narendra Modi and Satyapal Malik
आमची मर्दाची पद्धत..! क्षीरसागरांचा पहिला वार चंद्रकांतदादांवर

या दोन्ही फायली घेऊन मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटायला गेलो होतो. त्यांनी मी यात असलेल्या गैरव्यवहाराबाबत स्पष्टपणे सांगितले होते. तसेच, यात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावेही मी सांगितली होती. मी काय निर्णय घ्यावा, असे मी त्यांना विचारले. मी कोणत्याही परिस्थितीत फायली मंजूर करणार नाही. मला तडजोड करावी लागल्यास मी राजीनामा देईन, असे मी मोदींना सांगितले. यावर त्यांनी माझे कौतुक करीत, सत्यपाल भ्रष्टाचाराबाबत कोणतीही तडजोड करू नका, असे सांगितले होते, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

Narendra Modi and Satyapal Malik
प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा दिलासा; तूर्तास अटक टळली

दरम्यान, मलिक यांनी त्यांना राष्ट्रपतिपदाची ऑफर देण्यात आल्याचे नुकतेच जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी हरियानातील कंडेला गावात खाप पंचायतीने आयोजित कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी मलिक म्हणाले होते की, मला गप्प बसण्यासाठी राष्ट्रपतिपदाची (President) ऑफर देण्यात आली आहे. पद हे काही कायम नसते. मी चौधरी चरणसिंह यांच्यासोबत काम केले आहे. ते मला त्यांच्या मुलाप्रमाणे वागणूक देत. मी आता तुम्हाला सांगतो की, तुम्ही रस्त्यावरील आंदोलन बंद करा. तुम्ही तुमचे सरकार स्थापन करा आणि सरकार बदला. कुणाकडे भीक मागण्याची आवश्यकता नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com