राजकारण तापलं! राज्यपालांनी सरकारला झापलं अन् थेट मुख्य सचिवांना दिला आदेश

राज्यपालांनी पोलिसांच्या कारवाईची घेतली गंभीर दखल
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankhar Sarkarnama

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि विरोधी पक्ष भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयावरच पोलिसांनी छापा टाकल्यानं राजकारण तापलं आहे. पोलिसांनी दहा गाड्यांसह मोठा फौजफाटा घेऊन ही कारवाई केली. विशेष म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभागानं तृणमूलच्या नऊ नेत्यांना नोटीस बजावल्यानंतर 24 तासांतच ही कारवाई करण्यात आली. याची गंभीर दखल राज्यपालांनी घेतली असून, तातडीनं अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.

राज्यपाल जगदीप धनखर यांनी या प्रकरणी आता पावले उचलली आहेत. त्यांनी तातडीनं या प्रकरणी मुख्य सचिवांना आदेश दिला आहे. राज्यपालांनी म्हटलं आहे की, पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना या प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारीच्या कार्यालयात आणि बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते. विरोधी पक्षनेत्यांवरील अशा प्रकारची कारवाई अतिशय गंभीर आहे. हा आमदारांच्या कार्यालयावर पोलिसांनी केलेला हल्ला आहे. त्यामुळे मुख्य सचिवांनी तातडीनं अहवाल द्यावा.

या कारवाईवर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) म्हणाले की, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि तपासणीचे वॉरंट नसताना तसेच, न्यायदंडाधिकारी उपस्थित नसताना पोलिसांनी कारवाई केली. ममतांचे पोलीस हे नंदिग्राममधील माझ्या कार्यालयात घुसले, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेत्यावर अशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून सू़डबुद्धीने कारवाई केली आहे.

Jagdeep Dhankhar
वाद पेटला! पोलीस कुलूप तोडून थेट विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातच घुसले

अधिकारी यांच्या नंदिग्राममधील कार्यालयावर पोलिसांनी छापा मारला. या वेळी दहा गाड्यांसह पोलीस फौजफाटा दाखल झाला होता. पोलिसांनी आधी परिसरात चौकशी केली. नंतर कार्यालयाचे कुलूप काढून पोलिसांनी तपासणी केली. या छाप्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, भाजप कार्यकर्ते देवव्रत मैती यांची विधानसभा निवडणुकीनंतर 3 मे 2021 रोजी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी सीबीआयने तृणमूलच्या नऊ नेत्यांना नोटीस बजावली आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर लगेचच अधिकारींच्या कार्यालयावर छापा पडल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

Jagdeep Dhankhar
राज्यसभेच्या चौथ्या जागेचा तिढा! काँग्रेसचा डोळा भाजपच्या जादा मतांवर

या छाप्याबाबत पूर्व मिदनापूरचे पोलीस अधीक्षक अमरनाथ के म्हणाले की, नंदिग्राममधील एका नेत्याच्या पत्नीला बनावट कागदपत्रांद्वारे सहकारी बँकेत नोकरी देण्यात आल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. ही तक्रार करणाऱ्याला काही जण धमकावत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. यातील आरोपींनी नंदिग्राममधील आमदाराच्या कार्यालयात आश्रय घेतल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे आम्ही बंद कार्यालयाचे कुलूप तोडून छापा मारला. आम्हाला सगळ्या खोल्या तपासू दिल्या नाहीत. फक्त तीन खोल्यांची तपासणी आम्ही केली. आरोपी न सापडल्याने आम्ही तेथून निघून आलो. या सर्व कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरणही आम्ही केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com