मोदी सरकारची मोठी घोषणा ; JET नोकरी भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र

सरकारी नोकरी भरती प्रक्रिया संयुक्त पात्रता परीक्षा ((Joint Eligibility Test)च्या माध्यमातून होणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरसोय टळणार आहे.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध विभागातील भरती प्रक्रिया आता राष्ट्रीय भरती यंत्रणेच्या (NRA) माध्यमातून होणार आहे. सरकारी नोकरी भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.

जितेंद्र सिंह म्हणाले, ''सरकारी नोकरी भरती प्रक्रिया संयुक्त पात्रता परीक्षा ((Joint Eligibility Test)च्या माध्यमातून होणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरसोय टळणार आहे.

पहिल्या टप्यात बँक, रेल्वे, कर्मचारी निवड आयोग या संबधीच्या सर्व परीक्षांचा यात समावेश आहे. पुढे या यंत्रणेला अधिक व्यापक बनविण्यात येणार आहे. जितेंद्र सिंह म्हणाले, ''मोदी सरकारनं सात वर्षात नोकरी भरती प्रक्रिया अधिक पारदर्शी केली आहे. नवीन पदांची संख्या वाढली आहे.''

नोकरी भरतीतील खटल्यामुळे अनेक वेळा भरती प्रक्रिया रखडते. पण सरकारच्या माध्यमातून विलंब केला जात नाही. ओबीसी आरक्षणामुळे अनेक प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ठ आहेत. २०१४ मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यावर केंद्रीय पदांची संख्या ३६.४५ लाख होती २०२०च्या अखेरील यात वाढ होऊन ती ४०.०४ लाख इतकी झाली. मोदी सरकारच्या कार्यकाळात ६.९८ लाख पदांची भरती करण्यात आली.

Narendra Modi
ममतांनी वेडेपणा सुरू केलायं ; कॉग्रेसचा पलटवार, यूपीए त्यांना माहीत नाही का !

बारा खासदारांच्या निलंबनाचे पडसाद आजही संसदेत उमटले. निलंबीत बारा खारदारांनी गुरुवारी संसदेच्या बाहेर मोदी सरकारचा निषेध करीत आंदोलन केलं. तर दुसरीकडे या निंलबीत खासदारांनी माफी मागण्याच्या मागणीवर सरकार ठाम आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन, महागाई या मुद्यांवर गुरुवारी विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं. महागाईच्या विषयावरुन

कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, राजद, टीएमसी, आईयूएमएलच्या खासदारांनी सभागृहाच्या बाहेर पडणे पसंत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com