नुपुर शर्मांच्या वादग्रस्त विधानानंतर मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये ; कायदा आणणार

खासदार मनोज झा हे संसदेच्या येत्या अधिवेशनात या विषयावर विधेयक मांडणार आहेत.
law against hate speech after nupur sharma and mahua moitra controversy
law against hate speech after nupur sharma and mahua moitra controversysarkarnama

नवी दिल्ली : वादग्रस्त विधान (Hate Speech) करुन देशातील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यासाठी आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. केंद्र सरकार (centre government) याबाबत लवकरच नवीन कायदा (law against hate speech) करणार आहे. (Hate Speech news)

अनेक नेत्यांच्या वादग्रस्त विधानानंतर देशात आंदोलन, जाळपोळ होत असते. त्यामुळे अशा वादग्रस्त विधान करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी हा कायदा करण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे (rjd)चे खासदार मनोज झा हे संसदेच्या येत्या अधिवेशनात या विषयावर विधेयक मांडणार आहेत. संसदेचे अधिवेशन हे १८ जुलैपासून सुरु होत आहे. हेट क्राईम हेट स्पीच २०२२ हे विधेयक मंजूर झाल्यास वादग्रस्त विधान करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात दंडात्मक कारवाई व अन्य कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

law against hate speech after nupur sharma and mahua moitra controversy
Municipal Elections : आघाडीसोबत राहायचे का ? ; अजितदादा म्हणाले..

"देशात लोकशाहीच्या मुल्यांवर आघात होत असल्याने अशा प्रकारचे विधेयक आणण्यात येत आहे," असे मनोज झा यांनी सांगितले. काही दिवसापूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्या नुपुर शर्मा, टीएमसीच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी अशाच प्रकारचे वादग्रस्त विधान केल्याने देशात अनेक ठिकाणी आंदोलन, हिंसाचाराचा घटना घडल्या.

नुपुर शर्मा (nupur sharma) यांनी पैगबरांवर तर महुआ यांनी काली माता यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानं देशात काही ठिकाणी हिंसाचाऱ्याच्या घटना घडल्या होत्या. या नव्या कायद्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यास मदत होईल, असे जाणकारांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in