शेतकऱ्यांसाठी खूषखबर; खरीप हंगामासाठी हमीभावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

मोदी सरकारने (Modi Government) खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांना (Farmers) खूषखबर दिली आहे.
MSP
MSPsarkarnama

नवी दिल्ली : मोदी सरकारने (Modi Government) खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांना (Farmers) खूषखबर दिली आहे. २०२२-२३ च्या खरीप हंगामासाठी तांदळाच्या(धान) व इतर काही पिकांच्या किमान हमीभावाला (MSP) मंत्रिमंडळाच्या व मंत्रिमंडळ आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या (सीसीईए) आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

सध्या तांदळासाठी सरकार प्रती क्विंटल १९४० रूपये एमएसपी देते. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) आज घेतला. तांदळाबरोबरच अन्य कोणत्या पिकांच्या हमीभावाला आज मंत्रिमंडलाने मंजूरी दिली याचा तपशील लवकरच समजेल. दरम्यान, खरीपासाठीच नव्हे तर आगामी रबी हंगामासाठीही देशात खते व कीटकनाशकांचा पुरेसा साठा देशाकडे आहे, असे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.

MSP
पंकजांना डच्चू दिल्यानंतर भुजबळाचं सूचक विधान ; खडसेंच्या बाबतीत तेच झालं होतं..

देशाकडे डी-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) व युरिया खतांचा पुरेसा साठा आहे व किमान डिसेंबरपर्यंत युरियाची आयात करण्याची गरज लागणार नाही असे सांगून मांडविया म्हणाले ''केंद्र सरकारने याआधीच १६ लाख टन युरीयाची आयात केली आहे. आगामी ४५ दिवसात राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना त्यांची मागणी व गरजांनुसार युरीयाचा पुरवठा करण्यात येईल. आतांतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमतींत घसरण झाली असून पुढच्या ६ महिन्यांत खतांचे दर आणखी खाली येतील'' असाही विश्वास मांडविया यांनी व्यक्त केला.

MSP
कर्डिलेंचा तो ठराव आला राम शिंदेंच्या कामी : भाजप कार्यकर्त्यांत जल्लोष

मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्य सरकारांकडे सध्या ७० लाख टन युरियाचा साठा आहे. १६ लाख टन युरीया भारताने आयात केले असून डिसेंबर २०२२ पर्यंत १७५ लाख टन युरियाचे उत्पादन होईल यासाठी सरकारची सज्जता आहे. बरौनी व सिंदरी येथील युरिया प्रकल्पांत २ नवीन संयंत्रे बसविल्यानेऑक्टोबरपर्यंत ६ लाख टन अतिरिक्त युरिया उत्पादनाला सुरवात होऊ शकणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com