Aam Aadmi Party : कर्नाटक निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांसाठी 'गूड न्यूज'; 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल

Arvind Kejriwal : यापुढे आता 'आप' हा राष्ट्रीय पक्ष असणार आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Politics : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत सर्व 224 जागा लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने (आप) घेतलेला आहे. त्यानुसार पक्षाने तयारी सुरू केली आहे. तर या निवडणुकीच्या आधीच आम आदमी पक्षाला मोठी गूड न्यूज मिळाली आहे. आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणुक आयोगाने बहाल केला आहे. त्यामुळे आता यापुढे 'आप' हा राष्ट्रीय पक्ष असणार आहे.

आम आदमी पक्षाला (AAP) एनसीटी-दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये निवडणूक वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार राज्य पक्षाचा दर्जा आहे. तरीही 'आप'ने पक्षाला 'राष्ट्रीय पक्ष'चा दर्जा देण्यास निवडणूक आयोग विलंब करत असल्याचा आरोप करत 'आप'ने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Arvind Kejriwal
NCP Lose Status of National Party : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 'या' राज्यांनी दिला दणका

तसेच 'आप' सर्व निकष पूर्ण करत असल्याने पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. कर्नाटक (Karnataka) युनिटचे पक्षाचे निमंत्रक पृथ्वी रेड्डी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेत 'आप'ने म्हटलं होतं की, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अटींची पूर्तता करतो, मात्र, तरीही पक्षाला राष्ट्रीय दर्जा देण्यास विलंब होत आहे, असं याचिकेत म्हटलं होतं.

या पार्श्वभूमीवरच कर्नाटक उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला याबबात 13 एप्रिलपूर्वी निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्या नंतर न्यायालयाच्या निर्देशाला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधीने यासंदर्भात 11 एप्रिल रोजीच निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं होतं.

Arvind Kejriwal
Vajramooth meeting News : परवानगी नाकारल्यास होईल नाचक्की, वज्रमूठ सभेचे स्थळ बदलणार ?

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने बहाल केला आहे. आता यापुढे आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष असणार आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com