शिंदे गटात गेल्याचा दावा खोटा; मी ठाकरेंसोबतच : शिवसेना नेत्याने ठणकावले

12 राज्यातील शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला होता
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून धक्के बसले आहेत. त्यानंतर बारा राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेत शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची बातमी समोर आली होती.

मात्र, गोव्याचे शिवसेनाप्रमुख जितेश कामत (Jitesh Kamat) यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो नाही, असे सांगत शिंदे गटात प्रवेशाचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगितले आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
'दसरा मेळावा' शिवतीर्थावरच : उद्धव ठाकरेंचा निर्धार

दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह बारा राज्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित नेते अधिकृत नसून, अधिकृत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अॅफिडेव्हिट देत आपल्यासोबत असल्याचे सांगितल्याचा खुलासाही ठाकरेंच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर गोव्याचे शिवसेनाप्रमुख कामत यांचा व्हिडिओ समोर आला.

एका व्हायरल पोस्टमध्ये १२ राज्यांच्या शिवसेना प्रमुखांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात होता. मात्र, मी शिंदेंना भेटायलाही गेलो नव्हतो. जे कोण भेटले, त्यांच्या विषयी मला माहिती नाही. माझे नाव त्यामध्ये घेऊ नये. कारण त्या व्हायरल फोटोत तर मी कुठे दिसत नाही, कारण मी तिथे गेलोच नाही. उद्धव ठाकरे यांनी मला पद दिले, मी त्यांच्यासोबतच आहे, असेही कामत यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
उपमुख्यमंत्री पद संवैधानिक नसतं, धनंजय मुंडेंनी दुसऱ्यांदा केला अजितदादांसमोर उल्लेख..

दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, मणिपूर, छत्तीसगड या राज्यांच्या नेत्यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याचा दावा केला जात होता. मात्र, त्यापैकी गोवा प्रमुखांनी स्पष्टीकरण दिले आहे. खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह कोणाकडे जाणार, यासारखे अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालयात व निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com