नाराजी दूर करताना फडणवीसांची दमछाक; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा राजीनामा

गोव्यातील उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीनेही गुरूवारी पक्ष सोडत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.
Deepak Pauskar, Devendra Fadnavis
Deepak Pauskar, Devendra FadnavisSarkarnama

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) भाजपमधील बंडोबांची संख्या वाढतच चालली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता सार्वजनिक मंत्र्यांनीही बंडाचं निशाण हाती घेतलं आहे. त्यांनी शुक्रवारी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा देत भाजपला धक्का दिला. त्यांनी भाजपच्या (BJP) उमेदवाराविरोधात अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बंडोबांना शांत करताना गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

दीपक पाऊसकर (deepak Pauskar) यांना तिकीट नाकारण्यात आल्याने ते नाराज होते. अखेर त्यांनी शुक्रवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पाऊसकर हे 2017 मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून पहिल्यांदाच आमदार झाले होते. पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची आशा होती. पण ऐनवेळी त्यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. (Goa Election Update)

Deepak Pauskar, Devendra Fadnavis
अखेर ठरलं : उत्पल पर्रीकर आज मोठी घोषणा करणार

राजीनामा दिल्यानंतर पाऊसकर म्हणाले, 'मी अपक्ष म्हणून लढणार आहे. मी मतदारसंघात भाजपच्या 16 हजार सदस्यांची नोंदणी केली. आता माझ्यासोबत 60 टक्क्यांहून अधिक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला आहे.' दरम्यान, पाऊसकर यांच्यावर भाजपमधील आमदारांनीच भरती घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यावर गोवा सरकारने तीन सदस्यांची चौकशी समितीही स्थापन केली होती. (Deepak Pauskar resigns)

दरम्यान, गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी 34 जणांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काही जणांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचा समावेश आहे. तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकरही भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavlekar) यांच्या पत्नी सावित्री कवळेकर (Savitri Kavlekar) यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यांनी गुरूवारी भाजपच्या (BJP) सदस्यत्वाचा राजीनामा देत अपङ म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्या सांगे मतदारसंघातून भाजपला आव्हान देणार आहे. या मतदारसंघात भाजपकडून सुभाष फळदेसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याही याच मतदारसंघातून इच्छुक होत्या. त्यांनी दोन दिवसांपूर्वी प्रचाराला सुरूवातही केली होती.

उत्पल पर्रीकर आज घोषणा करणार

उत्पल पर्रीकर यांना पणजीतून तिकीट नाकारण्यात आल्याने तेही पक्षावर नाराज आहेत. त्यांना इतर दोन मतदारसंघाची ऑफर देण्यात आली आहे. तसेच इतर पक्षांनीही त्यांना पणजीतून उमेदवारी देण्याची ऑफर दिली आहे. आता ते कोणता पर्याय स्वीकारणार याबाबत दुपारी पत्रकार परिषदेत घोषणा करणार आहेत. त्यामुळे गोवा भाजपमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. पर्रीकर यांनी बंड केलं तर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com