अपक्ष आमदाराने भाजपला ऐनवेळी दाखवला ठेंगा!

गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला (BJP) धक्के बसत आहेत.
Govind Gaude
Govind GaudeSarkarnama

पणजी : गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला (BJP) धक्के बसत आहेत. आज सकाळी पक्षाच्या बड्या नेत्यानं मंत्रिपदासह आमदारकीचाही तडकाफडकी राजीनामा दिला. यानंतर लगेचच दुपारी पक्षाच्या एका आमदाराने राजीनामा देत धक्का दिला. आता गोव्याचे सांस्कृतिक मंत्री व अपक्ष आमदार गोविंद गौडे (Govidn Gaude) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत घूमजाव केले आहे.

गौडे हे अपक्ष आमदार असले तरी सरकारमध्ये मंत्री आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे पक्ष नेतृत्वानेच जाहीर केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानवडे यांनी गौडे हे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यांना प्रियोळ मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे स्थानिक नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. गौडेंना तिकिट दिल्यास स्थानिक उमेदवार विरोधात देण्याचा इशारा दिला होता.

अखेर गौडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मुहूर्त पुढे ढकलला. पक्षांतर्गत नाराजीचा त्यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला असता. त्यामुळे त्यांनी भाजप प्रवेश लांबवणीवर टाकला आहे. याबद्दल बोलताना गौडे म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत अद्याप मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. आज रात्री मी समर्थकांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेईन.

आतापर्यंत भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या चारवर गेली आहे. भाजपमधील गळती थांबत नसल्याने पक्ष नेतृत्व धास्तावले आहे. गोव्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या धामधुमीत भाजपला गळती लागली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यानंतर काही तासांतच मायेम मतदारसंघातील आमदार प्रवीण झांटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

Govind Gaude
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण देशाला होतोय असाही फायदा!

मायकल लोबो (Michael Lobo) यांचा उत्तर गोव्यात मोठा दबदबा असल्याचे मानले जाते. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. लोबो यांच्यासोबत रेईस मागोस हे नेतेही भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. लोबो हे कलंगुट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. तर मागोस यांना सलीगांव मतदारसंघातून उमेदवारी अपेक्षित आहे. लोबो यांनी अद्याप कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट केलेलं नाही.

Govind Gaude
बुधवार पेठेत दगडूशेठ गणपतीही आहे! खडसेंची महाजनांना गुगली

आता प्रवीण झांटे यांनीही आमदारकीची राजीनामा दिला आहे. प्रवीण झांटे हे राज्यातील मोठे उद्योगपती आहेत. त्यांचे पिता हे काँग्रेसचे उत्तर गोव्यातील खासदार होते. काँग्रेसने 2012 मध्ये त्यांना तिकिट नाकारले होते. यामुळे मागील विधानसभा निवडणुकीवेळी 2017 मध्ये ते भाजपमध्ये गेले होते. भाजपच्या तिकिटावर ते मायेम मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात (मगोप) प्रवेश करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com