माजी मुख्यमंत्री जाताना काँग्रेसला खिंडार पाडून गेले!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
Luizinho Faleiro Joins TMC.
Luizinho Faleiro Joins TMC.

नवी दिल्ली : गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फेलेरो (Luizinho Faleiro) यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. बुधवारी त्यांनी कोलकता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला. त्यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह नऊ जणांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

फेलेरो हे गोवा काँग्रेसचे (Goa Congress) दिग्गज नेते मानले जात होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांना काही दिवसांपूर्वीच गोव्यात समन्वय समितीचे अध्यक्ष करण्यात आलं होतं. पण आता त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पक्षाला धक्का बसला आहे. पुढील वर्षी गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापाश्वर्भूमीवर तृणमूल काँग्रेसकडून गोव्यातील निवडणूक लढवली जाणार आहे. फेलेरो यांच्यासारखा बडा नेता त्यांच्या गळाला लागला आहे.

Luizinho Faleiro Joins TMC.
यूपीएससीत टॉप करताच शुभम कुमार यांची अशीही फसवणूक

फेलेरो यांनी बुधवारी कोलकता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत नऊ जणांसह तृणमूलमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते. फेलेरो यांच्यासह गोवा काँग्रेसचे माजी सरचिटणीस यतिश नाईक व विजय वासुदेव पोय, माजी राज्य सचिव मारिओ पिंटो डी सँटना व आनंद नाईक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी शिवदास सोनू नाईक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते व माजी आमदार लहू मामलेदार, दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष अँटोनियो मोंटेरिओ क्लोविस दा कोस्टा, राजेंद्र शिवाजी काकोडकर हे तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत.

गोव्यात 2017 मध्ये हातातोंडाशी आलेला घास गेला होता. यावेळी पक्षाला गोव्यात सत्ता स्थापन करण्याबाबत अपेक्षा होती. पण दिग्गज नेत्यानं सोडचिठ्ठी दिल्यानं पक्षाला यावेळी इतर नेते व कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमध्ये सुधारण्याची कोणतीच आशा वाटत नाही. गोवा काँग्रेसमध्येही सर्वकाही ठीक नाही. भाजपविरोधात लढण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्यासारख्या लढवय्याची गरज असल्याचे फेलेरो दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते.

गोवा सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. त्यासाठी ममतांसारख्या लढवय्याची गरज आहे. मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. सर्व काँग्रेस पक्षांनी एकत्र येत पुढील लोकसभा निवडणूक लढवावी, असं मला वाटतं. ममतांची धोरणं, विचारधारा ही काँग्रेसचीच आहे, असं फेलेरो म्हणाले. 71 वर्षांचे फेलेरो 1998-99 यावर्षी मुख्यमंत्री होते. त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यामुळे 40 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे केवळ पाच आमदार उरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com