मोठी घडामोड : काँग्रेसच्या बैठकीला सात आमदारांची दांडी, काही आमदार भाजपच्या संपर्कात?

गोवा काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे वारे वाहू लागले आहेत.
Congress Latest Marathi News, Goa Congress News
Congress Latest Marathi News, Goa Congress NewsSarkarnama

पणजी : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवस आधीच गोवा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं बोलावलेल्या बैठकीला 11 पैकी सात आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री व गटनेते दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. या सात आमदारांपैकी काही आमदार भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याची चर्चा आहे. (Goa Congress Latest News)

गोव्यातील काँग्रेसमागे लागलेले फुटीचे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. काँग्रेसचे 11 पैकी आठ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कामत यांच्यासह आमदार मायकल लोबो व इतर सहा आमदारांचा त्यामध्ये समावेश आहे.

Congress Latest Marathi News, Goa Congress News
Shiv Sena Latest News : खासदार गावितांच्या पत्राने शिवसेनेत फुटीची ठिणगी

गोवा विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली आहे. पण त्यामध्ये सात आमदार अनुपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. पक्षाला केवळ अकरा जागांवर समाधान मानावे लागले. पण मागील निवडणुकीनंतर पक्षाला पडलेल्या खिंडारानंतरही हे यश पक्षाला मिळालं. प्रचारादरम्यान पक्षाने सर्व उमेदवारांना शपथ दिली. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले की, निवडून आल्यानंतर इतर पक्षात जाणार नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचारादरम्यान काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत, असा प्रचार केला होता. या निवडणुकीनंतर आता काही महिन्यातच काँग्रेसमधील आठ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेस नेत्यांकडून मात्र या अफवा असल्याचे सांगितले जात आहे.

Congress Latest Marathi News, Goa Congress News
शिवसेना अन् शिंदे गटाच्या भांडणात आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचणार; 53 आमदारांना नोटीस

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, 'सरकारकडून अफवा आणि संभ्रम पसरवला जात आहे. आण्ही पक्षाच्या आमदारांची काही दिवसांपूर्वीच बैठक घेतली होती. या बैठकीला कामतही उपस्थित होते.' शनिवारी झालेल्या बैठकीपासून मात्र कामत दूर राहिले. त्यादिवशी कामत एका मठात गेले होते, असा खुलासाही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com