गोव्यात काँग्रेस पुन्हा एकदा गॅसवर; ५ आमदारांची रवानगी चेन्नई मुक्कामी

Goa | BJP | Congress : गोव्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसच्या हालचाली
Congress Latest News, BJP Latest Marathi News, Tripura Bypoll Result
Congress Latest News, BJP Latest Marathi News, Tripura Bypoll ResultSarkarnama

पणजी : गोव्यातील राजकीय घडामोडींमधील उलथापलथ अजूनही सुरु असून पुन्हा एकदा रिसॉर्ट पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे. १८ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने (Congress) आपल्या ५ आमदारांना चेन्नई मुक्कामी पाठविले आहे. या पाच आमदारांमध्ये संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रुडॉल्फ फर्नांडिस, एल्टन डिकॉस्टा आणि कार्लोस फेरेरा यांचा समावेश आहे. (Goa Congress Latest News)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आमदारांनी भाजपशी संधान न साधता काँग्रेसशी निष्ठा कायम राखावी यासाठी ही अधिकची काळजी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळ माध्यम समुहाच्या गोमंतक प्रतिनिधींनी याबाबत चैन्नई दौऱ्यावर असणाऱ्या आमदारांशी संपर्क साधला असता, गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी महत्त्वाची चर्चा करावयाची असल्याने आम्हाला चैन्नई दौरा करावा लागला, अशी माहिती दिली आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात ज्याप्रमाणे शिवसेनेतील (Shivsena) तब्बल दोन तृतीयांश आमदारांनी वेगळी भूमिका घेतली होती, त्याचप्रमाणेच गोव्यात देखील माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael lobo) यांच्या नेतृत्वात घडामोडी घडणार होत्या. दोन तृतीयांश आमदार फोडून काँग्रेसचा विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याचे आपले प्रयत्न कामत आणि लोबो या दोन्ही नेत्यांनी रात्री शेवटपर्यंत चालू ठेवले होते.

काँग्रेसच्या या बंडात सुरवातीला दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई व कार्लोस फेरेरा हे सहा आमदार होते. अशातच एका खनिज उद्योजकाच्या मध्यस्थीने आमदार आलेक्स सिक्वेरा हेही त्यांच्यात सामील झाले. मात्र दोन तृतीयांश आमदारांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आठवा आमदार न मिळाल्याने काँग्रेसमधील हे बंड तुर्तास गुंडाळले असल्याचे बोलले जात आहे. परंतु त्यानंतरही काँग्रेसने जे पहिल्यापासून काँग्रेससोबत आहेत त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नई मुक्कामी पाठविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com