मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब होताच सावंतांना पहिली आठवण पर्रीकरांची!

गोव्यात भाजपसमोर मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला होता, तो अखेर सुटला आहे.
Pramod Sawant and Manohar Parrikar
Pramod Sawant and Manohar Parrikar Sarkarnama

पणजी : गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाच पुन्हा संधी देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यानंतर सावंतांनी पहिली आठवण गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची काढली आहे. पर्रीकरांमुळे राजकीय कारकिर्द सुरू झाल्याचे ऋण सावंतांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणचे पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांनाच भाजपने तिकीट नाकारले होते.

मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचा आज स्मृतिदिन आहे. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मिरामार येथील पर्रीकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. या निमित्ताने सावंतांनी पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मनोहरभाई हे नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. आदर्श म्हणून आपण पाहावे, असे ते व्यक्ती होते. त्यांनी मला फक्त राजकारणात आणले नाही तर वेळोवेळी मला प्रामाणिकपणे समाज कल्याणासाठी काम करायचे हे शिकवले. आज त्यांची पुण्यतिथी असून, मी त्यांना अभिवादन करतो.

Pramod Sawant and Manohar Parrikar
अशीही खेळी! आता विधानसभेत आमदारांचं होणार आपोआप निलंबन

सावंतांनी पर्रीकरांना श्रेय दिले असले तरी त्यांच्या मुलालाच भाजपने विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले होते. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) हे पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र, भाजपने विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना न दुखावण्याची भूमिका घेतली होती. यामुळेच उत्पल यांना डावलून मोन्सेरात यांना तिकीट देण्यात आले. अखेर उत्पल यांनी अपक्ष म्हणून पणजीतून लढत दिली. यात त्यांना पराभव पत्करावा लागला. आता सावंत हे पुन्हा मुख्यमंत्री होत असताना त्यांनी मनोहर पर्रीकरांना श्रेय दिल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Pramod Sawant and Manohar Parrikar
आमदारांना चहा पाजणाऱ्या नेत्याला मोदींनी पुन्हा बनवलं मुख्यमंत्री

गोव्यात (Goa) विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला (BJP) मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून गटबाजी उफाळली होती. याला प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचा निसटता विजयही कारणीभूत होता. साखळी मतदारसंघातून सावंत यांचा केवळ ६६६ मतांनी विजय झाला आहे. सावंत यांच्या खराब कामगिरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे सावंतांची विकेट पडून मुख्यमंत्रिपदासाठी दुसरे नाव पुढे केले जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा सावंतांनाच संधी दिली आहे. विश्वजित राणे (Vishwajit Rane) हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. राणे हे आरोग्यमंत्री होते. ते आणि त्यांच्या पत्नी असे दोघेही विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com