भाजपला धक्का : विश्वजित राणेंचा 'आप'मध्ये प्रवेश

2017 मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराकडून राणेंचा पराभव झाला होता.
भाजपला धक्का : विश्वजित राणेंचा 'आप'मध्ये प्रवेश
Vishwajeet Rane Joins AAP

पणजी : पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीआधी गोवा भाजपला (Goa BJP) मोठा धक्का भाजपला आहे. भाजपचे नेते विश्वजित कृष्णराव राणे (Vishwajeet Rane) यांनी पक्षाला रामराम करत आम आदमी पक्षात (AAP) प्रवेश केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपकडून गोव्यात जोर लावण्यास सुरूवात करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राणे यांच्यासोबत भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला आहे.

पुढील वर्षी गोव्यासह उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप, काँग्रेससह इतर पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. गोव्यामध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. सत्ता परत मिळवण्यासाठी भाजप कामाला लागले आहे. मात्र, यंदाची निवडणूक यावर्षी सोपी नसेल, असे राजकीय विश्लेषक सांगतात. त्यातच आता स्थानिक नेत्यांनी भाजपला झटका देण्यास सुरूवात केली आहे.

Vishwajeet Rane Joins AAP
STकर्मचाऱ्यांना २४ तासांचा अल्टिमेटम ; ''कामावर हजर व्हा, अन्यथा सेवा समाप्त''

मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात दाखल होत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांच्या उपस्थितीत सट्टारी येथे झालेल्या कार्यक्रमात राणे यांनी आपमध्ये प्रेश केला. राणे हे गोव्यातील स्थानिक नेते असून 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पोरियम विधानसभा मतदारसंघातून तिकीटही दिले होते. पण काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता.

दरम्यान, केजरीवाल यांनी यावेळी भाजपसह काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप आणि काँग्रेस म्हणते की केजरीवाल सर्व काही वाटत आहे. मी त्या नेत्यांना विचारू इच्छितो की, एका मंत्र्याला दर महिन्याला तीन हजार यूनिट वीज मोफत मिळते. मी नागरिकांना दर महिन्याला 300 यूनिट मोफत दिली तर काय बिघडले, असा सवाल केजरीवाल यांनी केला.

मी राजकीय नेता नाही. मी तुमच्यासारखाच सर्वसामान्य नागरिक आहे. दहा वर्षांपूर्वी काँग्रेस आणि भाजपमध्ये एक सेटिंग झाली होती. ते प्रत्येक पाच वर्षात आलटून पालटून सत्तेत असतात. आम्ही दिल्लीत सर्वात चांगले सरकार दिले आहे. दिल्लीतील शाळांची स्थिती सुधारली आहे. अनेकांनी आपल्या मुलांना खासगी शाळांतून काढत सरकारी शाळांमध्ये दाखल केले आहे, असे केजरीवाल म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in